Agriculture News : दाट धुक्यामुळे पिकांसह फळबागांवर रोगांचा प्रादुर्भाव; मका, ज्वारी वर अळीचा प्रादुर्भाव

Jalna News : रब्बी हंगामातील तूर, हरभरा, मका यासह द्राक्ष आणि मोसंबी यासारख्या फळबागांवर देखील रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात
Agriculture News
Agriculture NewsSaam tv
Published On

जालना : मागील दोन आठवड्यांपासून थंडीची चाहूल लागली आहे. याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होत असता तरी काही दिवसांपासून दाट धुके पडत असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव पडल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने तूर, हरभरा यासह द्राक्ष व मोसंबीवर रोग पडला आहे. तर मका आणि ज्वारी वर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पडल्याचे दिसून येत आहे. 

जालना (Jalna) जिल्ह्यात मागील आठवड्यापासून थंडीचा जोर कायम आहे अशातच दाट धूक्याची चादर देखील पसरत असल्यामुळे रब्बी हंगामातील तूर, हरभरा, मका यासह द्राक्ष आणि मोसंबी यासारख्या फळबागांवर देखील रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी (Farmer) पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. तर बुरशीजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी महागडे औषधाची फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याच चित्र बदनापूर तालुक्यात दिसून येत आहे. 

Agriculture News
Crop Insurance : २३५ कोटी रुपयाचा पिक विमा मोबदला बाकी; पिकविम्यासाठी रविकांत तुपकरांची कृषी कार्यालयात धडक

उत्पादनात घट होण्याची शक्यता 

रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उत्पादनात देखील मोठी घट होणार असून शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. दरम्यान फळबागांवर पसरलेल्या रोगांबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे; अशी मागणी आता फळबाग उत्पादक शेतकरी करत आहे.

Agriculture News
Dharashiv News : अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षाच; धाराशिव जिल्ह्यातील २ लाख ६० हजार शेतकरी वंचित

उन्हाळी मक्यावर अळ्यांचा प्रादुर्भाव
जालना जिल्ह्यातील जाफराबाद, बदनापूर आणि भोकरदन तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या उन्हाळी मका लागवड केली आहे. या पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. ऐन वाढीच्या आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या मका पिकावर रोग पडल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान लष्करी अळीवर उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांची शिबिरे घ्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

ज्वारीवर अमेरिकन अळीचा प्रादुर्भाव

परभणी : परभणी जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात पेरणी झालेले ज्वारीचे पीक जोमदार वाढीच्या अवस्थेत आहे. अशातच या कोवळ्या पिकावर अमेरिकन लष्करी अळीने हल्ला चढविला आहे. यामुळे ज्वारीची वाढ खुंटत असून वेळीच उपाययोजना करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. सध्या ही ज्वारी वाढीच्या अवस्थेत आहे. सुरवातीला पेरलेल्या ज्वारीवर घातक अशा अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने अळी ज्वारीचा पोंगा फस्त करीत आहे. यामुळे पिकाची वाढ खुंटून मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या अळीचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com