Sambhaji Nagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhaji Nagar News: चक्क फिरते गर्भलिंग निदान केंद्र, फोन करताच डॉक्टर नर्ससह पोचायचा घरी; वाळूज पोलिसांनी केला रॅकेटचा पर्दाफाश

चक्क फिरते गर्भलिंग निदान केंद्र, फोन करताच डॉक्टर नर्ससह पोचायचा घरी; वाळूज पोलिसांनी केला रॅकेटचा पर्दाफाश

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

छत्रपती संभाजीनगर : छत्रपत्री संभाजीनगरच्या वाळूज परिसरात फिरते गर्भलिंग निदान केंद्र चालवण्याच्या रॉकेटचा वाळूज (Police) पोलिसांनी भांडाफोड केला आहे. यामुळे अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्यांचे धाबे दणाणले असले, तरी आरोग्य व्यवस्थेवर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण (Sambhajinagar) मागच्या तीन महिन्यांमध्ये तीन अवैध सेंटर उघडकीस आले आहेत. (Maharashtra News)

गर्भलिंग निदान करण्यास कायद्यानुसार बंदी असताना अनेक ठिकाणी केवळ पैशांसाठी छुप्या पद्धतीने गर्भलिंग निदान केंद्र सुरू असल्याचे प्रकार आतापर्यंत अनेकदा कारवाईतून समोर आले आहेत. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यावर्षी अशा दोन ते तीन मोठ्या कारवाया देखील करण्यात आल्या आहेत. मात्र असे असतानाही डॉक्टर चक्क चार चाकीद्वारे घरोघरी फिरून गर्भलिंग निदान करत होता. तसेच तो एका चाचणीचे पाच हजार रुपये घेत असल्याचे त्याने आपल्या कबुली जवाबात सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले. डॉ. सुनील राजपूत असे या डॉक्टरचे तर पूजा भालेराव असे ताब्यात घेतलेल्या नर्सचे नाव आहेत.

सापळा रचून पकडले

गर्भलिंग निदान करण्यास कायदेशीर मान्यता नसली तरी आजही मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान केले जाते. याआधी गर्भलिंग निदान करण्याचे अनेक केंद्र पाहिले असतील. मात्र छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये आरोपी (Doctor) गर्भलिंगनिदान चाचणी करणारे साहित्य चक्क आपल्या चार चाकी गाडीत घेऊन फिरत होता. इतकेच नव्हे तर फोन केल्यावर तो थेट घरी येऊन गर्भलिंग निदान करण्यासाठी येत होता. यामुळे या डॉक्टरला पकडण्याचे आव्हान पोलीस तसेच आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहिले. मात्र या सर्व प्रकाराची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी सापळा रचून या डॉक्टरांसह त्याच्यासोबत असणाऱ्या नर्सला ताब्यात घेतले आहे.

यापुर्वीही सापडला होता डॉक्‍टर

या डॉक्टरचे याच्या आधीही शहरातील उस्मानपुरा पोलीसांनी कारवाई केलेल्या एका रॅकेटमध्ये त्याचे नाव होते. आतापर्यंत लपून-छपून गर्भलिंग निदान चाचण्या करण्यात येत असल्याचे अनेकदा समोर आले आहेत. पण थेट फिरते गर्भलिंग निदान केंद्र सुरू असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली असून आरोग्य विभागाच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

SCROLL FOR NEXT