Kharat case controversy, Sambhaji Bhide statement Saam
महाराष्ट्र

Kharat Case : 'खरातला मारुन मोकळं व्हा' खरातच्या वासनांधतेवर भिडेंचा भडका

Ashok Kharat Case : खरात प्रकरणात एसआयटी चौकशी सुरू असताना संभाजी भिडेंच्या 'मारून टाका' वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण. राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण. वाचा सविस्तर.

Bharat Mohalkar

Kharat case controversy, Sambhaji Bhide statement : एसआयटीच्या दणक्यानं खरात पोपटासारखा बोलायला लागलाय. काळ्या कारनाम्यांची माहिती द्यायला लागला. त्याच दरम्यान आता खरातला मारुन मोकळं व्हा, असं वक्तव्यच संभाजी भिडेंनी केलंय. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

ज्योतिषशास्त्राच्या नावावर महिलांना गंडा घालणारा... त्यांचं शोषण करणाऱ्या विकृत खरातच्या मुसक्या आवळल्यानं त्याच्या काळ्या कारनाम्यांचं बिंग फुटलं... आता एसआयटी चौकशीत राजकीय नेते... प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतचं कनेक्शन उघड होण्याची शक्यता असतानाच संभाजी भिडेंनी मात्र पाखंडी खरातला मारुन टाका आणि मोकळं व्हा, असं वक्तव्य केलंय.. दुसरीकडे मंत्र्यांना वाचवण्यासाठीच भिडेंनी हे वक्तव्य केल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय..

खरंतर एका बाजूला एसआयटी चौकशीमुळे खरातचा पाय खोलात गेलाय.. आतापर्यंत खरातविरोधात 8 तर सिन्नर आणि वावी पोलीस ठाण्यात आणखी 2 अशा 10 एफआयआर दाखल झाल्या आहेत.. त्यामुळे फक्त महिलांचं शोषणच नाही तर जमीन खरेदी विक्रीचं रॅकेट... शेतकऱ्यांच्या जमीनी लुटण्याचा गोरखधंदा उघड होतोय..एवढंच नाही तर खरातनं नरबळी दिल्याचाही संशय व्यक्त केला जातोय... त्यामुळे या सगळ्यांची चौकशी होऊन खरातला फाशी व्हावी ही मागणी होत असतानाच आता संभाजी भिडेंनी खरातला मारुन टाकण्याची भाषा केलीय.. त्यामुळे भिडेंचा हा संताप आहे की बड्या मंत्र्यांना वाचवण्यासाठीचा त्रागा? याचीच चर्चा रंगलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कंगनानंतर रामदेव बाबांनीही तोडले तारे, रामदेव म्हणतात जेन-झींमुळे भारताची बदनामी

Maharashtra News Live Update: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षाने बँक मॅनेजरच्या लगावली कान शिलात.

Ticket Booking : रेल्वेचं तिकीट बुक करताना 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा; मिनिटांत होईल कन्फर्म

शाळांना सुट्टी जाहीर! माकडांच्या दहशतीमुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

CJP आंदोलकांवरील गुन्हे मागे! दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT