Samarjeet Ghatge comment on kolhapur loksabha candidature  Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur Political News: 'दिल्लीचं माझ्यावर जास्त प्रेम'; कोल्हापूरमधून उमेदवारीबाबत समरजीत घाटगे काय म्हणाले?

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर | कोल्हापूर

Kolhapur Lok Sabha Election 2024 News:

लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. मात्र राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा काही सुटताना दिसत नाही. दोन्ही बाजून बैठकांचा सिलसिला सुरुच आहे. दरम्यान काही जागांवर बाजूने राजकीय डावपेच आखले जात आहे. त्यातली एक जागा कोल्हापूरची आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या टाकलेला डाव लक्षात घेत महायुतीकडून समरजीत घाटगे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याबाबत बोलताना समरजीत घाटगे यांनी म्हटलं की, कोल्हापूर लोकसभेचा उमेदवार कोण होणार हा दिल्लीचा निर्णय आहे. पक्ष जो उमेदवार ठरवेल त्या उमेदवाराला उच्चांकी मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. माझ्या उमेदवारीबद्दलची चर्चा दिल्लीत ठरू दे, गल्लीत याविषयी चर्चा करायला नको. (Latest Marathi News)

दिल्लीत जे ठरेल त्याप्रमाणे आपण भविष्यकाळात काम करू. आपल्या लोकांची अशीच सेवा करण्याची संधी शाहू महाराजांचं जनक घराणं म्हणून मला मिळावी, असं भाजप नेते समरजीत घाटगे यांनी म्हटलं आहे.

दिल्लीचं माझ्यावर जास्त प्रेम आहे, असं सूचक वक्तव्य समरजीत घाटगे यांनी केलं आहे. देशाचा संपूर्ण विकास हा मोदीजी यांच्यामुळेच झाला आहे. त्यामुळे आपकी बार 400 पार हा संदेश घेऊन निवडणुकीत सामोरे जाणार. माझ्यावर वैयक्तिक प्रेम असल्यामुळे पदाधिकारी काही घोषणा करतात. मात्र पक्षशिष्टाचार हा महत्त्वाचा आहे, असंही समरजीत यांनी म्हटलं.

कोल्हापूरची जागा महायुतीत शिवसेनेच्या वाट्यालवा आली तर समरजीत घाटगे यांना शिवसेनेतून उमेदवारी दिली जाऊ शकते. समरजीत घाटगे यांच्यासह धनंजय महाडिक यांच्या नावाचीही सध्या चर्चा आहे. मात्र या संदर्भात अधिकृत माहिती अद्याप कुणीही दिली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon News : जळगावच्या एरंडोलमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; आगीत ८ जण होरपळले

Big Boss 18: चाहत पांडे ते अॅलिस कौशिक...हिंदी बिग बॅास 18 स्पर्धकांची नावे

Marathi News Live Updates : राज ठाकरे घेणार पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा

Bigg Boss Marathi : झापुक झुपूक म्हणत गुलीगत पॅटर्नची महाराष्ट्रात हवा, ट्रॉफी उचलल्यावर सूरजची पहिली प्रतिक्रिया

Oil India Jobs: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ऑइल इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु; अर्जप्रक्रिया जाणून घ्या

SCROLL FOR NEXT