Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले? बीड आणि कोल्हापूरमध्ये कोणाला मिळणार संधी? पाहा लिस्ट

Bjp Maharashtra Lok Sabha List: लोकसभा निवडणुकीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपकडून काही उमेदवारांची नावे निश्चित झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Bjp Maharashtra Lok Sabha List
Bjp Maharashtra Lok Sabha ListSaam Tv
Published On

Bjp Maharashtra Lok Sabha List:

लोकसभा निवडणुकीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपकडून काही उमेदवारांची नावे निश्चित झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरमधून समरजीत घाडगे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. जर शिंदे यांच्या शिवसेनेने जागा सोडली नाही तर घाडगे यांना शिवसेना चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगितले जाणार, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड येथून भाजप खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे उमेदवारी दिली जाऊ शकते. तसेच केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना लोकसभा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे. आज झालेल्या भाजपच्या बैठकीत ही नावे ठरली असल्याचं सांगण्यात येत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bjp Maharashtra Lok Sabha List
CAA Act Implementation: मोठी बातमी! देशभरात आजपासून CAA लागू, केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली अधिसूचना

सूत्रांनी सांगितलं की, या बैठकीत सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या नावावर चर्चा आहे. आजच्या बैठकीत जवळपास १५ नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे. (Latest Marathi News)

आजच्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती:

  • नागपूर - नितीन गडकरी

  • जालना - रावसाहेब दानवे

  • चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार

  • पुणे - मुरलीधर मोहोळ

  • सांगली - संजय काका पाटील

  • भिवंडी - कपिल पाटील

  • दिंडोरी - भारती पवार

  • बीड - पंकजा मुंडे

Bjp Maharashtra Lok Sabha List
Amravati News: कमानीचा वाद, दगडफेक आणि लाठीचार्ज; अमरावतीत काय घडलं?

दरम्यान, महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत २४ जागांवर चर्चा होणार आहे. मागच्या वेळी भाजपने लढलेल्या सर्व जागांवर आज चर्चा झाली. चर्चेनंतर कोअर कमिटीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यादी सादर केली. त्यातील काही नावांची उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com