Sakal Saam Survey Saamtv
महाराष्ट्र

Sakal Saam Survey: फोडाफोडीच्या राजकारणानंतर भाजपला मिळणार का जनतेची साथ? २०२४ ला सत्ता कोणाची? सर्व्हेत मतदारांनी मांडलं स्पष्ट मत...

Sakal Saam Survey On Maharashtra Politics: नाट्यमय घडामोडीमुळे आगामी निवडणूकीत जनतेचा कौल कोणाला असेल.. याबद्दलची धक्कादायक माहिती सर्वेमधून समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Saam TV Survey On Maharashtra Politcs: दोन आठवड्यापूर्वीच राष्ट्रवादीत मोठी फूट पडून अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ भेटली. या सगळ्या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे नव्याने आखली गेली आहेत. एका वर्षापूर्वीच शिवसेनेमधील एक गट फुटून भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला होता.

त्यानंतर आता राष्ट्रवादीनेही तोच पाढा गिरवल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच या संपूर्ण राजकीय परिस्थितीबद्दल नाराजी दिसत आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत जनतेचा कौल कोणाला असेल.. याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी सकाळ माध्यम समूह आणि साम टीव्ही न्यूज यांनी राष्ट्रवादी Next 'महासर्वेक्षण' (Sakal-Saam Survekshan) केलं आहे.

कसा झाला सर्वे...

हे सर्वेक्षण राज्यातील सगळ्या मतदार संघात करण्यात आला आहे. यामध्ये सगळ्या लिंगाचे म्हणजे स्त्री-पुरुष आणि सगळ्या वयोगटातील मतदारांचा समावेश आहे. यात राज्यातील 73 हजार नागरिकांनी भाग घेतला आहे. या सर्वेमध्ये मतदारांना आगामी निवडणूकीबाबत प्रश्न विचारण्यात आला.

विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मतदान करताना पुढीलपैकी कोणत्या पक्षाची निवड कराल?

भाजप- 26.8%

काँग्रेस- 19.1%

राष्ट्रवादी- (शरद पवार) 14.9%

राष्ट्रवादी- (अजित पवार) 5.7%

एकनाथ शिंदे- 4.9%

उद्धव ठाकरे- 12.7%

मनसे - 2.8%

वंचित- 2.8%

इतर- 10.3

या मध्ये मतदारांनी सर्वाधिक मते ही भाजपच्या पारड्यात टाकली असून २६.२ लोकांनी भाजपची निवड केली आहे. त्याखाली राज्यातील मतदारांनी कॉंग्रेसला पसंती दाखवली असून १९. १ टक्के लोकांनी कॉंग्रेसला सत्तेत पाहण्यासाठी पसंती दर्शवली आहे.

तसेच या सर्वेमध्ये मतदारांना लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र झाल्या तर एकाच पक्षाला मतदान करणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर सर्वाधिक म्हणजे ४७.९% लोकांनी पक्षाला मतदान करणार असल्याचे सांगितले आहे. तर २७.३ % लोकांनी अशा मतदानाला नापसंती दर्शवली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या तर आपण दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाला मतदान करणार आहात का?

हो - 47.9%

नाही - 27.3%

सांगता येत नाही - 24.8%

भाजप सत्तेत यावा असं वाटणाऱ्या मतदारांचा कल..

हो - 65%

नाही - 16%

सांगता येत नाही - 19%

दरम्यान, यामध्ये भाजप सत्तेत यावा अशी वाटणाऱ्या मतदारांचीही संख्या मोठी आहे. राज्यातील ६५% लोकांनी भाजपला पुन्हा सत्तेत पाहण्यासाठी पसंती दर्शवली आहे. तर १६ टक्के लोकांनी भाजपच्या विरोधात कौल दिला आहे. (Maharashtra Politics News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Health: हे '४' पेय करतात यकृतावर गंभीर परिणाम ; तुम्हीही करता का या पेयांचे सेवन, वेळीच व्हा सावध

Maharashtra News Live Updates: गुजरातच्या पोरबंदरवरून मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त

Maharashtra Politics : भाजपला विनंती, उद्धव ठाकरे म्हणाले मी बोलणी करायला तयार

Kitchen tips: हात खराब न करता चपातीचं पीठ कसं भिजवाल? पाहा एक सोपा देसी जुगाड

Ram-Leela Movie: रामलीला चित्रपटासाठी दीपिका पदुकोण नव्हती पहिली पसंती; तर या प्रसिद्ध अभिनेत्रीला  करण्यात आला होता रोल ऑफर...

SCROLL FOR NEXT