Pune Politics: दादा... जरा आता आमचाही विचार करा की; मनसेच्या वसंत मोरेंची थेट अजित पवारांना विनंती

MNS Pune city chief Vasant More: वसंत मोरे यांनी एक फेसबूक पोस्ट करून अजित पवारांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्याचे आवाहन केले आहे.
MNS Pune city chief Vasant More
MNS Pune city chief Vasant Moresaam tv
Published On

Pune Politics: "दादा... जरा आता आमचाही विचार करा की" असं पुण्यातील मनसेचे बडे नेते वसंत मोरे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना एक आवाहन केले आहे. वसंत मोरे यांनी एक फेसबूक पोस्ट करून अजित पवारांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्याचे आवाहन केले आहे.

"तुमच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे तुम्ही पुन्हा एकदा सत्तेत आलात. पुन्हा तुमचा राज्याभिषेकही झाला आहे, मनासारखं खातंही मिळालं आहे. आता 'जरा आता आमचाही विचार करा की, दादा घ्या की महानगरपालिकेच्या निवडणुका", असे वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

वसंत मोरेंनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?

"होय दादा एक विनंती करू का? 2021 मध्ये तुम्ही उपुख्यमंत्री असताना तुम्ही आणि तुमच्या पूर्वीच्या महविकास आघाडी सरकारने प्रचंड कष्ट करून पुणे महानगरपालिकेची 3 नगरसेवकांची प्रभाग रचना केली होती, जी आजही कायम आहे. अगदी अगदी आरक्षणाची सोडत ही पूर्ण झालेली आहे. निवडणुका तुम्ही घेणारच होता, पण सारे केलेले कष्ट वाया गेले. राज्यात सत्ता बदल झाला." (Tajya Marathi Batmya)

"आता परत तुमच्या धाडसी निर्णयामुळे, तुमच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे तुम्ही पुन्हा एकदा सत्तेत आलात. पुन्हा तुमचा राज्याभिषेकही झालाय. मनासारखे खाते ही मिळाले आहे. जरा आता आमचाही विचार करा की, दादा घ्या की महानगरपालिकेच्या निवडणुका..." अशी पोस्ट वसंत मोरे यांनी फेसबूकवर केली आहे. (Latest Political News)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर प्रमुख आणि नगरसेवक वसंत मोरे हे त्यांच्या धडाडीच्या कामाच्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. 'मी जेव्हा एखादा विषय हातात घेतो, तेव्हा नुसते कागदी घोडे नाचवत नाही, तर पूर्ण अभ्यास करून विषय हाताळतो, असे त्यांनी नुकतेच म्हटले आहे. वसंत मोरे हे मनसेचे पुण्यातील प्रमुख नेते आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com