Saam TV Marathi municipal elections exit poll  Saam TV Marathi
महाराष्ट्र

Saam TV Exit Poll : तुमच्या महापालिकेत कुणाची सत्ता? थोड्याच वेळात पाहा महा एक्झिट पोल, EXCLUSIVE

Maharashtra Municipal Exit Poll: मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महापालिकांवर कुणाची सत्ता येणार याचा अचूक अंदाज सकाळ माध्यम समूहाच्या महा एक्झिट पोलमधून मिळणार आहे.

Namdeo Kumbhar

Saam TV Marathi municipal elections exit poll : मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी आज मतदान पार पडले. शुक्रवारी, २९ महापालिकांवर कुणाची सत्ता येणार याबाबत अधिकृत माहिती आयोगाकडून जाहीर करण्यात येणार आहे. पण त्याआधी सकाळ माध्यम समूहाकडून २९ महापालिकांचा सर्व्हे घेण्यात आला. कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता येणार? याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. आज, ५.३० वाजता महापालिकांचा महा एक्झिटपोल लाईव्ह पाहता येणार आहे.

एक्झिट पोल कुठे पाहता येणार ?

२९ महापालिकेत कुणाची सत्ता येणार? याकडे देशाचं लक्ष लागलेय. उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे. आज साडेपाच वाजता सकाळ माध्यम समूहाचा एक्झिट पोल सर्वांना पाहता येणार आहे. हा एक्झिट पोल सकाळ समूहाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. त्यामध्ये, https://saamtv.esakal.com, https://www.esakal.com/ आणि https://sarkarnama.esakal.com/ या डिजिटलप्लॅटफॉर्मवर सर्व्हेचा अंदाज पाहता येणार आहे. तर साम टीव्हीवर लाईव्ह एक्झिट पोल तुम्ही पाहू शकता. तुमच्या महापालिकेत कुणाची सत्ता येणार? याचा अचूक अंदाज पाहण्यासाठी साम टीव्ही पाहायला विसरू नका.

एक्झिट पोल कसा घेतला?

गुरूवारी राज्यात २९ महापालिकेसाठी मतसंग्राम रंगला. मतदारांनी आपला कौल मतपेटीतून व्यक्त केला. सकाळ माध्यम समूहाने आपल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लोकांची मते जाणून घेत एक्झिट पोल तयार केला आहे. एक्झिट पोलमध्ये कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता येणार? याचा अंदाज वर्तवलाय. नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेतही सकाळ समूहाने एक्झिट पोलचा अचूक अंदाज वर्तवला होता. आता महापालिकांतही कुणाचे सरकार येऊ शकते, याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. साडेपाच वाजता सर्व्हे लाईव्ह होणार आहे. साम टीव्ही पहायला विसरू नका.

कोण कोणत्या महापालिकांचा एक्झिट पोल पाहता येणार?

  1. महानगरपालिका

  2. बृहन्मुंबई (BMC)

  3. ठाणे

  4. कल्याण-डोंबिवली

  5. नवी मुंबई

  6. मिरा-भाईंदर

  7. उल्हासनगर

  8. वसई-विरार

  9. भिवंडी-निजामपूर

  10. पुणे

  11. पिंपरी-चिंचवड

  12. नाशिक

  13. नागपूर

  14. कोल्हापूर

  15. सांगली-मिरज-कुपवाड

  16. सोलापूर

  17. अमरावती

  18. अकोला

  19. नांदेड-वाघाळा

  20. परभणी

  21. मालेगाव

  22. अहमदनगर

  23. धुळे

  24. चंद्रपूर

  25. लातूर

  26. जळगाव

  27. छत्रपती संभाजीनगर

  28. जालना

  29. इचलकरंजी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, राधाकृष्ण विखे पाटील गड राखणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर

Saam Tv Exit Poll: मालेगावमध्ये एमआयएम सर्वात मोठा पक्ष, कुणाची सत्ता येणार?

Night Habits: रात्रीच्या या 5 वाईट सवयींचा आरोग्यावर होतो परिणाम

SaamTV Exit Poll: सांगलीचं मैदान भाजपनं मारलं; एकहाती सत्ता राहणार?

Municipal Elections Voting Live updates: वसई पूर्वेच्या वसंत नगरीतील सेठ विद्यामंदिर मध्ये भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT