Breaking News , Suraj Pawar Saam tv
महाराष्ट्र

Sairat : 'सैराट' मधील 'त्या' कलाकारास पाेलिसांनी घेतलं ताब्यात

पाेलीसांनी सध्या चाैकशी सुरु केली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन बनसाेडे

Suraj Pawar News : सैराट चित्रपटातील कलाकार सुरज पवार (Suraj Pawar) यास पोलीसांनी आज ताब्यात घेतलं आहे. मंत्रालयात नोकरी (job) लावून देण्याचं आमीष देवून पैशाची लुट प्रकरणाचा तपास राहूरी पाेलीस करीत आहेत. त्याअनुषंगाने सुरज पवारची चाैकशी करण्यासाठी त्याला पाेलिसांनी (police) ताब्यात घेतले आहे.

मंत्रालयात नोकरीला लावून देतो असे आमीष दाखवून नगर जिल्ह्यातील एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाची लाखों रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींच्या नुकत्याच मुसक्या आवळल्या आहेत. फसवणुकीसाठी त्यांनी राजमुद्रेचा देखील गैरवापर केल्याच समाेर आलं हाेते.

या प्रकरणातील धक्कादायक म्हणजे सैराट चित्रपटातील प्रिन्स अर्थात अभिनेता सुरज पवार याचे देखील नाव समोर आले हाेते. त्यामुळं पोलीसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. आज पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सूरज पवार यास चौकशीसाठी ताब्यात घेतलं. दरम्यान या चाैकशीनंतर गुन्हात सहभाग आढळल्यास सुरज पवारला अटक ही हाेऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

SCROLL FOR NEXT