Shirdi yandex
महाराष्ट्र

Shirdi News: साईभक्तांसाठी खुशखबर! साईबाबांच्या 'चर्म पादुका' देशभरातील विविध शहरांमध्ये दर्शनासाठी होणार उपलब्ध

Charm Paduka: साईबाबांच्या मुळ चर्म पादुका आता देशभरातील विविध शहरांमध्ये दर्शनासाठी उपलब्ध होणार आहेत, ज्यामुळे लाखो साईभक्तांना शिर्डी न जाता साईबाबांचे दर्शन घेता येईल.

Dhanshri Shintre

सचिन बनसोडे/साम टीव्ही न्यूज

साईभक्तांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्यावतीने साईबाबांच्या मूळ 'चर्म पादुका' देशभरातील विविध शहरांमध्ये दर्शनासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील आठ शहरांमध्ये १० ते २५ एप्रिल दरम्यान हा दर्शन सोहळा संपन्न होईल.

देशभरातील कोट्यवधी साईभक्त दरवर्षी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतात. आता मात्र साक्षात साईबाबांच्या मुळ चर्म पादुका देशभरातील विविध शहरांमध्ये दर्शनासाठी उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू या तीन राज्यतील आठ शहरांमध्ये या पादुका दर्शनासाठी उपलब्ध असतील. १० ते १३ एप्रिल पर्यंत महाराष्ट्रातील सांगली शहर आणि जिल्ह्यातील पेठ वडगाव येथे भाविकांना दर्शनासाठी साईबाबांच्या मूळ चरण पादुका दर्शनासाठी उपलब्ध असणार आहेत.

१४ ते १८ एप्रिलपर्यंत कर्नाटक राज्यातील, दावनगेरे, मल्लेश्वरम येथे पाच दिवस साईबाबांच्या पादुका भाविकांना दर्शनासाठी असणार आहेत. यानंतर १९ ते २५ एप्रिलपर्यंत तामिळनाडू राज्यातील सेलम, करूर, पुलीयमपट्टी, धर्मापुरी येथे या पादुका भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध असतील. २६ एप्रिल रोजी धर्मापुरी साई बाबांच्या पादुका पुन्हा शिर्डीकडे रवाना होतील. असा तब्बल २७७६ किलोमीटरचा या मूळ चर्म पादुकांचा दौरा असणार आहे. शिर्डीचे साईबाबा संस्थान आणि स्थानिक आयोजन कमिटीच्या वतीने हा पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या दर्शन सोहळ्यादम्यान स्थानिक आयोजन कमिटीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी पादुका सोहळा आयोजित करण्यात आला आहे, त्याच ठिकाणी पादुका ठेवण्यात येणार आहेत. कोणत्याही भाविकांच्या घरी या पादुका नेण्यात येणार नाहीत. साई संस्थानच्या अधिकाऱ्यांनासह सुरक्षारक्षक तसेच साई मंदिरातील पुजारी असा एकूण २० कर्मचाऱ्यांचा या पादुका सोहळ्यात सहभाग असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uber Driver Viral Video : 'मी पोलिसांना घाबरत नाही जा...', आधी महिला प्रवाशांना शिवीगाळ, नंतर मारण्यासाठी धावला; उबर चालकाचा VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

SCROLL FOR NEXT