Sahitya Akadami Puraskar 2023: Saam Tv
महाराष्ट्र

Sahitya Akadami Puraskar 2023: साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर; विशाखा विश्वनाथांना युवा, तर एकनाथ आव्हाडांना बालसाहित्य पुरस्कार जाहीर

साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर; विशाखा विश्वनाथांना युवा, तर एकनाथ आव्हाडांना बालसाहित्य पुरस्कार जाहीर

साम टिव्ही ब्युरो

Sahitya Akadami Puraskar 2023: देशातील साहित्य क्षेत्रात मानाचे पुरस्कार समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदाच्या वर्षी मराठी साहित्याक्षेत्रातूनही युवा आणि बाल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

यामध्ये विशाखा विश्वनाथ यांच्या स्वतला स्वताविरुद्ध उभं करताना या काव्यसंग्रहाला युवा साहित्य अकादमीनं गौरविण्यात आले आहे. तर एकनाथ आव्हाड यांच्या छंद देई आनंद नावाच्या काव्यसंग्रहाला बालसाहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

याशिवाय हिंदीमध्ये अतुल कुमार यांच्या चांदपूर की चंद्राला तर इंग्रजीमध्ये अनिरुद्ध कानिसेट्टी यांच्या लॉर्डस ऑफ द डेक्कन- सदर्न इंडिया फ्रॉम द चालुक्याज टू ज चोलाज या पुस्तकाला पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे.  (Latest Marathi News)

युवा साहित्य पुरस्कारांमध्ये 20 भाषेतील युवा साहित्यिकांना अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. तर, बाल साहित्य पुरस्कारांसाठी  22 भाषेतील साहित्यकांची अकादमीच्या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह आणि 50 हजार रूपये रोख असे आहे.

बालसाहित्य पुरस्कार मिळालेले इतर साहित्यिक पुढीलप्रमाणे आहेत:

आसामी - रथींद्रनाथ गोस्वामी 'पोवलमोनी चिंचिंगार दुःखशाहक अभिज्ञान' (कादंबरी)

बांगला - श्यामलकांती दास 'एरोप्लॅनर कथा' (कादंबरी)

बोडो - प्रतिमा नंदी 'नारझरी ग' सैनी गोजों नोजोर' (कथा)

डोगरी - बलवान सिंग 'जामोदिया कंजकन' (कविता)

गुजराती - रक्षाबेहन प्रल्हाद राव दवे 'हुण म्याव तू चुनून' (कविता आणि कथा)

कन्नड - विजयश्री हलादी 'सुरक्की गेट' (कादंबरी),

कोकणी - तुकाराम 'रामा शेट जान' (कादंबरी),

मैथिली - अक्षय आनंद 'सनी' 'ओल कटरा, झोल कटरा' (कविता)

मल्याळम - प्रिया ए.एस. पेरुमाझायते कुनिथालुगल (कादंबरी)

मराठी - एकनाथ आव्हाड 'छंद देई आनंद' (कविता),

नेपाळी - मधुसूदन बिष्ट 'बाल एकांकी नाटकहरू' (नाटक),

ओडिया - जुगल किशोर षडांगी 'जेझेंका गुप गांथिली' (कथा)

राजस्थानी - किरण बादल 'तबरन री दुनिया' (संस्मरण)

संस्कृत - राधावल्लभ त्रिपाठी 'मानवी' (कादंबरी)

संथाली - मानसिंग माझी 'नेने-पेठे' (कथा)

सिंधी - ढोलनू राही 'वांगमल जी शादी' (कविता)

तमिळ - उदयशंकर 'अदानिन बोम्मई' (कादंबरी)

तेलुगु - डी.के. चडुवूल बाबू 'वज्रला वाण' (कथा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

SCROLL FOR NEXT