Breaking News: विद्यार्थ्यांचा ताण होणार कमी, नापास झाल्यावरही मिळणार पुन्हा संधी; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

विद्यार्थ्यांचा ताण होणार कमी, नापास झाल्यावरही मिळणार पुन्हा संधी; शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra New Education Policy
Maharashtra New Education PolicySaam Tv
Published On

Maharashtra New Education Policy: शालेय विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे सरकारने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत त्यांचा ताण कमी करण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

आता इयत्ता पाचवी आणि आठवीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे. सरकारने नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा निर्णय जाहीर केला आहे.

Maharashtra New Education Policy
MHADA Lottery 2023 Mumbai: मोठी बातमी! म्हाडाने मुंबईच्या घरांसाठी अर्ज सादर करण्यास दिली मुदतवाढ

नापास विद्यार्थ्यांची दोन महिन्यांच्या आत होणार पुनर्परीक्षा

याबाबत शासनाकडून नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. यामध्ये लिहिलं आहे की, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (शैक्षणिक प्राधिकरण) इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन यांची कार्यपद्धती निश्चित करेल. (Latest Marathi News)

यात पुढे लिहिलं आहे की, जर विद्यार्थी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही, तर अशा विद्यार्थ्यांना संबंधित विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान केले जाईल आणि वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत त्याची पुनर्परीक्षा घेतली जाईल.

Maharashtra New Education Policy
Aadhaar PVC Card: नव्या रूपात आलं 'आधार', कसं काढायचं नवीन आधार PVC कार्ड? जाणून घ्या

यामध्ये असंही लिहिलं आहे की, इयत्ता पाचवीच्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल. इयत्ता सहावी ते सातवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीच्या वर्गासाठीची विहित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील. विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण नसल्यास त्या विद्यार्थ्याला इयत्ता पाचवीच्या वर्गात प्रवेश देण्यात येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com