MHADA Lottery 2023 Mumbai: मोठी बातमी! म्हाडाने मुंबईच्या घरांसाठी अर्ज सादर करण्यास दिली मुदतवाढ

MHADA Lottery 2023 Mumbai : सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेमधे सहभाग घेण्याकरिता नागरिकांच्या सोयीकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे.
MHADA Lottery 2023
MHADA Lottery 2023Saam TV
Published On

Mumbai News: मुंबई शहरात घर घेणाऱ्यांसाठी महत्वाचं वृत्त हाती आलं आहे. म्हाडाने म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ४०८२ सदनिका नुकत्याच जाहीर केल्या होत्या. सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेमधे सहभाग घेण्याकरिता नागरिकांच्या सोयीकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी व अनामत रकमेचा भरणा करण्यासाठी दि. १० जुलै, २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

मुंबई मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदार दि. १० जुलै, २०२३ रोजी सायंकाळी ०६ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील. तर रात्री ११.५९ वाजेपर्यंत अनामत रक्कमेचा ऑनलाइन भरणा करू शकतील.

तसेच  दि. १२ जुलै, २०२३ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे.

MHADA Lottery 2023
Nitin Gadkari News: 'सत्य मांडण्याची पत्रकारांना किंमत मोजावी लागते..' केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत

दि. १७ जुलै, २०२३ रोजी दुपारी ३ वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. १९ जुलै, २०२३ रोजी दुपारी ०३ वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती दाखल करता येणार आहेत.

MHADA Lottery 2023
Nana Patole News: लोकशाही, संविधान व अन्नदात्यावरील संकट टळो आणि काँग्रेसची सत्ता येवो; नाना पटोलेंचं तुळजाभवानी चरणी साकडं

सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार असून सोडतीचा दिनांक व वेळ नंतर जाहीर करण्यात येणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com