सचिन बनसोडे, साम टीव्ही
कोपरगाव तालुक्यातील साहिल खंडीझोड या युवकाच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. आर्म्स ॲक्टअंतर्गत शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या साहिलचा जामिनावर सुटल्यानंतर महिनाभराच्या आत मृत्यू झाला. तुरूंगात असताना पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच साहिलचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणीही कुटुंबीयांनी केली आहे. मात्र, साहिलच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
कोपरगाव तालुक्यातील वेस येथील साहिल खंडिझोड या युवकाला शिर्डी पोलिसांनी 30 ऑगस्ट रोजी गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या विरोधात आर्म्स ॲक्टअंतर्गत कारवाई करण्यात आली. या प्रकरणात पाच दिवसांची पोलीस कोठडी आणि त्यानंतर चार दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली होती. 9 सप्टेंबरला साहिलची जामिनावर सुटका झाली होती. मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही साहिलची डोकेदुखी थांबली नव्हती, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. जामिनावर सुटल्यानंतर महिनाभरात साहिलचा मृत्यू झाला. पोलिसांच्या ताब्यात असताना झालेल्या कथित मारहाणीमुळेच साहिलचा मृत्यू झाल्याचा आरोप आता कुटुंबीयांनी केला आहे.. त्यामुळे या मृत्यूमागचं नेमकं सत्य काय? असा सवाल उपस्थित होत आहे..
साहिलच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी केलेले आरोप गंभीर आहेत. आता या प्रकरणात पोलिसांची अधिकृत भूमिका काय असणार? आणि साहिलच्या मृत्यूचं गूढ उकलणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.