Sadanand Kadam ED Custody  SAAM TV
महाराष्ट्र

Sadanand Kadam : सदानंद कदम यांना १५ मार्चपर्यंत ईडी कोठडी, मनी लॉंड्रीन्ग झाल्याचं कोर्टानं केलं मान्य

Sadanand Kadam ED Custody : सदानंद कदम यांना १५ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्यात आले आहे. ईडीच्या युक्तिवादानंतर कोर्टाने प्रथमदर्शनी मनी लॉंड्रीन्ग झाल्याचे मान्य केले आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सुरज सावंत

Dapoli Sai Resort Scam: राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सदानंद कदम यांना १५ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्यात आले आहे. ईडीच्या युक्तिवादानंतर कोर्टाने प्रथमदर्शनी मनी लॉंड्रीन्ग झाल्याचे मान्य केले आहे. ईडीने या प्रकरणात 14 दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु कोर्टाने कदम यांनी १५ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनवली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, कदम यांना कोठडीत असताना औषधी घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. कदम यांना ब्लड प्रेशर असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. मात्र घरचं जेवण देण्यास ईडीने विरोध केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जिल्ह्यातील साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाचं आणि संशयास्पद खरेदी-विक्रीचं प्रकरण राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.

किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर याप्रकरणी अनेक ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात ठाकरे घटाचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांचंही नाव आलं होतं आणि त्यांचीही चौकशी करण्यात आली होती. (Latest Marathi News)

अनिल परबांच्या अडचणीत वाढ?

सदानंद कदम हे शिवसेना नेते रामदास कदम यांचे भाऊ असले तरी दोघा भावांमध्ये वाद आहेत. तसेच सदानंद कदम हे ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे ईडीने कदम यांना अटक केल्यानतंर अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT