New Delhi: कोरोनाची डोकेदुखी कमी झाल्याने मोकळा श्वास घेत असतानाच आता पुन्हा एकदा मास्क वापरण्याची वेळ आली आहे. भारतात नव्या H3N2 इन्फ्लूएंझा (H3N2 Influenza) विषाणूच्या संसर्गाने चिंता वाढवली आहे. देशात ३ हजारांपेक्षा अधिक रूग्ण आढळले आहेत, त्यामुळेच आरोग्य मंत्रालयाने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सुरक्षित अंतर ठेवण्याच्याही सुचना दिल्या गेल्या आहेत. (Latest Marathi News)
सध्या कोरोना (Coronavirus) रुग्णांमध्ये घट झाली असली तरी नव्या विषाणूनं डोकं वर काढलं आहे. हवामान बदलामुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. सर्दी आणि सततचा खोकला यावर औषधही बेजार झाली आहेत. औषधं घेतल्यानंतरही बहुतेकांना खोकल्यापासून पूर्णपणे आराम मिळताना दिसत नाहीय. हा व्हायरल संसर्ग H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होत आहे. H3N2 इन्फ्लूएंझा विषाणू H1N1 इन्फ्लूएंझा विषाणूचा उपप्रकार म्हणजेच बदललेलं स्वरुप आहे.
नीती आयोगाने (Niti Ayog) कोविड टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य सचिव, राज्य आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक आज महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्राने राज्यांना पत्र लिहीत कोविड प्रोटोकॉलचे पालन करा आणि मास्क वापरा, असा सल्ला दिला आहे. राज्यांनी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा सुनिश्चित करावा, रुग्णांचं बारकाईने निरीक्षण करावं, असं सांगितलं आहे. तसेच कमी प्रतिकारक क्षमता असलेल्या लोकांनी काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. ज्या जिल्ह्यात रूग्ण आढळले आहेत त्या जिल्ह्यांनी तात्काळ आरोग्य विभागाला सूचना करावी, असेही सांगण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.