Jalgaon News: जळगावमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का! जिल्हा बॅंक निवडणूकीत बंडखोर संजय पवार विजयी

निवडणुकीत राष्ट्रवादीत बंडखोरी झाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ॲड रवींद्र पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला.
Eknath Khadase
Eknath KhadaseSaamtv

Jalgaon DCC Bank: जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली. जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवारांचे समर्थक संजय पवार यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा धक्का बसला आहे. जिल्हा बॅकेत अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे रविंद्र भैय्या पाटील यांचे नाव निश्चित झाले असतानाही राष्ट्रवादीचे संजय पवार यांनीही आयत्यावेळी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. यानंतर गुप्त पद्धतीनं मतदान झालं. यामध्ये संजय पवार विजयी झाले आहेत.

Eknath Khadase
Sanjay Raut News : हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडी कारवाईवर संजय राऊत भडकले; म्हणाले, मुलुंडचा पोपटलाल...'

जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवारांचे (Ajit Pawar) समर्थक संजय पवार यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीत बंडखोरी झाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ॲड रवींद्र पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला.

या निवडणूकीत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संजय पवार यांचा विजय झाला. दुसरीकडे जळगाव जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी शिंदे गटाचे उमेदवार अमोल पाटील बिनविरोध झाली आहे. या धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीत गद्दारी झाल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

Eknath Khadase
Pandharpur News : 'तो' शिक्षक एकही दिवस शाळेत आला नाही, मुख्याध्यापकानं हडपला ३.५ लाख पगार

दरम्यान, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महाविकास आघाडी व शिवसेना (शिंदे गट) यांची संयुक्त सत्ता होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दहा, शिवसेना शिंदे गटाचे पाच, कॉंग्रेसचे तीन, शिवसेना ठाकरे गटाचे दोन, तर भाजपचा एक सदस्य आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील शिंदे गटाचे आहेत. तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन भाजपचे आहेत, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्याकडे बँकेचे नेतृत्व आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com