Pandharpur News : 'तो' शिक्षक एकही दिवस शाळेत आला नाही, मुख्याध्यापकानं हडपला ३.५ लाख पगार

Pandharpur News : शाळेत एकही दिवस न आलेल्या शिक्षकाचे साडेतीन लाख रुपयांचे वेतन मुख्याध्यापकानेच हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Pandharpur News
Pandharpur News SAAM TV

भारत नागणे, पंढरपूर

Pandharpur News : खासगी विनाअनुदानित शाळेत एकही दिवस न आलेल्या शिक्षकाचे साडेतीन लाख रुपयांचे वेतन बनावट स्वाक्षऱ्या करून मुख्याध्यापकानेच हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी माढा तालुक्यातील आलेगाव (खु) येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब केचे याच्यावर टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

Pandharpur News
Satara Accident : साताऱ्यात भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या २५ मार्च २०२१ रोजीच्या आदेशानुसार नोव्हेंबर २०२० पासून सरस्वती विद्यालयाच्या पाचवी ते सातवीपर्यंतच्या वर्गाला २० टक्के अनुदान मिळाले. त्यानंतर सागर नवगण यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून हजेरीपत्रक बनवून वेतनदेयक तयार करण्यात आले.

नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२२ या काळातील तीन लाख ५८ हजार ६२३ रुपयांचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे काढले. नवगण यांचे जिल्हा बँकेच्या भीमानगर शाखेत खाते नसल्याने त्यांचे वेतन शाळेच्या खात्यात जमा झाले. त्या खात्यातून साडेसात लाख रुपये काढून दादासाहेब केचे पतसंस्थेत वर्ग केले.

Pandharpur News
Crime News: सांगली जिल्हा हादरला! जमिनीच्या वादातून दोघांचा खून; चौघेजण गंभीर जखमी

जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब केचे यांनी सागर नवगण यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांचा गैरवापर केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले.

त्यामुळे संबंधित मुख्याध्यापकावर सरकारची फसवणूक करून रकमेचा अपहार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com