सचिन वाजेला दिवसाला २ कोटीचं टार्गेट  
महाराष्ट्र

सचिन वाजेला दिवसाला २ कोटीचं टार्गेट

परमबीर सिंग यांच्याबद्दल नवीन धक्कादायक गौप्यस्फोट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सूरज सावंत

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) पुन्हा अडचणीत आले आहेत. तुरुंगात असलेल्या सचिन वाजे (sachin Waze) व त्यांच्याविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात वसुलीची तक्रार नोंदवण्यात आली आहे. हा गुन्हा बिमल अग्रवाल या व्यापाऱ्याने नोंदवला आहे. अग्रवालने पोलिसांना दिलेल्या जबानीत धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. आपला एक नंबर बॉस परमबीर सिंग आहेत, असं सचिन वाझेने सांगितल्याचं तक्रारदाराचं म्हणणं आहे.

हे देखील पहा -

तक्रारदाराच्या जबाबात भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांचाही उल्लेख आहे. "पोलीस सेवेत दाखल होण्यापूर्वीच सचिन वाजेने व्यापारी व बुकींसोबत मिटिंग केली होती. पोलिस दलात नियुक्त होण्यापूर्वीच वसुलीसाठी वाजेची व्यापारी, बार मालक आणि बुकींसोबत बोलणी सुरु होती" असे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले.

"परमबीर सिंग यांना रोजचं 2 कोटीचं कलेक्शन हवं होतं, कोरोनामुळे वसुलीला फटका बसल्याने वाझेला हे टार्गेट दिले होते. वसुलीतील ७५ टक्के पैसे १ नंबरला तर २५ टक्के पैसे वाटून घेण्याचं प्लान ठरला होता" असा तक्रारदाराचा दावा आहे. कोरोना काळातील झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी पालिकेतील कंत्राटदारांनाही वाजेने लक्ष्य केलं होतं, असं तक्रारदाराने पोलिसांना सांगितलं.

परमबीर सिंग आयुक्त झाल्यानंतर वाजेने हॉटेल-बार चालकांना तसेचं बुकींना दरवाजा उघडा ठेवून व्यवसाय करायची हमी दिली होती, असं तक्रारदाराने आपल्या जबानीत म्हटलं आहे. परमबीर सिंग, सचिन वाजे आणि त्यांचे इतर सहकारी तक्रारदाराचा ही मनसुख हिरेन करतील अशी भिती तक्रारदाराला आहे. त्यामुळेच घरातल्यांसाठी त्यांनी संरक्षण मागितलं आहे.

जानेवारी-फेब्रुवारी २०२० ते मार्च २०२१ मध्ये आरोपींनी आपल्याकडून ९ लाख रुपय वसूल केले होते, असे बिमल अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. अग्रवाल यांनी त्यांच्या तक्रारीत गोरेगाव मध्ये BOHO रेस्टॉरंट एंड बार आणि अंधेरी ओशिवारा मध्ये BCB रेस्टॉरंट एंड बार चालवण्यासाठ सचिन वाजे आणि इतर आरोपीनी ९ लाख रुपये, सँमसंग कंपनीचे फोल्ड -२ मोबाइल हप्ता म्हणून घेतले, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी IPC कलम ३८४, ३८५ आणि ३४ कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: परळीत ५० हजार मतांनी धनंजय मुंडे आघाडीवर

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

IND vs AUS 1st Test: लाईव्ह सामन्यात हर्षित राणा अन् मिचेल स्टार्क भिडले! नेमकं काय घडलं? -VIDEO

Vidhan Sabha Election Results : सुरुवातीच्या कलात भाजपने गाठलं शतक!

SCROLL FOR NEXT