mahayuti  Saam tv
महाराष्ट्र

Nagarparishad Election Result: हे जिंकले कसे?, महायुतीच्या विजयानंतर सामनातून सडकून टीका

Shivsena Thackeray Group On Mahayuti: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये २८८ पैकी नगराध्यक्षांच्या एकूण २०७ जागांवर महायुतीने विजय मिळवला. तर महाविकास आघाडीला फक्त ४४ जागांवर समाधान मानावे लागले. सर्वात जास्त भाजपचे नगराध्यक्ष विजयी झालेत.

Priya More

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीने मुसंडी मारली तर महाविकास आघाडीची घसरगुंडी झाली. राज्यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपने १२० नगरपरिषद आणि नगरपंचायतीवर सत्ता मिळवली. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाने ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ३७ ठिकाणी विजय मिळवला. या निवडणुकीमध्ये महायुतीने विक्रम केला असून राज्यभर जल्लोष केला जात आहे. २८८ पैकी नगराध्यक्षांच्या एकूण २०७ जागांवर महायुतीने विजय मिळवला. तर महाविकास आघाडीला फक्त ४४ जागांवर समाधान मानावे लागले. महायुतीच्या या विजयावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. अशातच सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि महायुतीच्या या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे जिंकले कसे? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

सामनाच्या अग्रलेखामध्ये महायुतीच्या विजयावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यात असे लिहिले की, 'भाजपने महाराष्ट्रात असे काय दिवे लावले, कोणता विकास केला, जनहिताची कोणती कामे केली की त्यामुळे महाराष्ट्राची जनता भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांना भरघोस मतदान करून विजयी करत आहे? अर्थात, हीच जनता पुन्हा निकालानंतर उघडपणे सांगते की, ‘‘आम्ही यांच्या कारभाराला आणि भ्रष्टाचाराला त्रासलो आहोत. आम्ही यांना मतदान केलेच नाही. मग हे विजयी कसे झाले हे रहस्यच आहे.’ विधानसभा निवडणुकीतही जनतेने हाच प्रश्न केला आणि आता नगरपालिका निवडणुकीतही याच प्रश्नाचे उत्तर जनता शोधत आहे. यांना मते दिली कोणी? यांना विजयी केले कुणी? पैशांनीच हे विजय विकत घेतले जाणार असतील तर या महाराष्ट्राची आन, बान, शान धुळीस मिळाली आहे आणि शिवरायांचा महाराष्ट्र अदानी, शहांच्या पैशांचा लाचार बनून सरपटताना दिसत आहे. हे चित्र देशासाठी धोकादायक आहे.'

निवडणुकीत पैशांची उधळण केल्याचा आरोप सामनातून करण्यात आला आहे. 'सध्या देशातील कोणत्याही निवडणुका म्हणजे पैशांचा धुरळा उडवणारा खेळ झाला आहे. जो पैशांचा धुरळा उडवेल तोच निवडणुकांच्या मैदानात टिकेल. त्यामुळे राज्यातील नगरपालिका-नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या दोन बगलबच्च्यांना भरघोस यश मिळाले. त्यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. २८८ नगराध्यक्षपदांच्या निवडणुका पार पडल्या. त्यात भाजप शंभरपेक्षा जास्त जागांवर विजयी झाला. संपूर्ण आकडेमोड अद्यापि व्हायची आहे. अमित शहांची शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी चाळीसपेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला. काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, खरी शिवसेना आणि इतर असे मिळून साठच्या आसपास जागा जिंकल्याचे समोर आले.'

निकालाचा पॅटर्न सेट असल्याचे म्हणत सामनात असे लिहिले की, 'असेच चित्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावेळी दिसले होते. तेव्हाही भाजप १३२, शिंदे गट ५७ आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ४१ अशाच जागा यांना मिळाल्या होत्या. म्हणजेच निवडणूक बदलली तरी निकालाचा पॅटर्न ‘सेट’च केलेला होता. त्या ‘सेटिंग’प्रमाणेच नगरपालिका आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निर्णय लागले आहेत. खरे म्हणजे या निवडणुकांत खरी लढत सत्ताधारी आणि विरोधकांत नव्हतीच. सत्ताधारी तीन पक्षांतच स्पर्धा आणि लढाईला रंग चढला होता. भाजपविरुद्ध शिंदे सेना व अजित पवार यांच्यातच मुकाबला झाला. हा मुकाबला पैसा आणि सत्तेच्या जोरजबरदस्तीचा होता हे आता पुराव्यासह उघड झाले.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूर महापालिकेच्या तोंडावर काँग्रेसला धक्का; माजी नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश

MNS-Shivsena: संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटं चर्चा; लवकरच युतीची घोषणा होणार

Akola : मंत्र्यांसमोरच शिवसेनेच्या २ गटामध्ये तुफान राडा, एकमेकांच्या अंगावर धावले अन् खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न

Bhimashankar Mandir: महत्त्वाची बातमी! भीमाशंकर मंदिर 3 महिन्यासाठी राहणार बंद; कारण काय?

Famous Actor : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याने आयुष्य संपवलं; मनोरंजनसृष्टीत खळबळ

SCROLL FOR NEXT