Nagar Parishad Election Result: लोकशाहीचा विजय! लोकवर्गणीतून लढवली नगरसेवक पदाची निवडणूक, अपक्ष उमेदवारानं शिवसेनेला दिली मात

Independent Candidate win Nagar Parishad Election: यवतमाळमधील नेर नगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवाराने शानदार विजय मिळवलाय. पैशाच्या ताकदीला हरवत येथे लोकशाहीचा उल्लेखनीय विजय झालाय.
Independent Candidate win Nagar Parishad Election
Independent Candidate win Nagar Parishad Electionsaam tv
Published On
Summary
  • नेर नगर परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार जांभा ऊर्फ सचिन कराळे यांचा ऐतिहासिक विजय.

  • लोकवर्गणीतून आणि सामान्य नागरिकांच्या मदतीने निवडणूक लढवली.

  • जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढत ठरली निर्णायक.

संजय राठोड, साम प्रतिनिधी

राज्याचे मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील नेर नगर परिषदेत जांभा ऊर्फ सचिन कैलास कराळे नावाच्या तरूणाने ऐतिहासिक विजयी मिळविल्याने जिल्ह्यात जांभाच्या विजयाची जोरदार चर्चा होत आहे. जांभा ऊर्फ सचिन कराळे या नवनिर्वाचित नगरसेवकाला राहायला घर नाही,सदैव त्याचा मुक्काम नेर च्या ग्रामीण रुग्णालयात किंवा बाजूच्या जैन नाश्ता सेंटरमध्ये असायचा.

Independent Candidate win Nagar Parishad Election
Municipal Council Nagar Panchayat Election Result: उत्तर महाराष्ट्रात भाजपला जोरदार झटका; जाणून घ्या संपूर्ण नगरपालिका आणि नगरपरिषदांचा निकाल

मात्र तो कायम लोकांच्या संपर्कात राहिला आक्रमक भाषा,सडपातळ देहयष्टी आणि लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेला त्याचा देह त्याला नेर नगर परिषदेच्या निवडणुकीत विजय दिला. एखाद्या चित्रपटाला शोभावी अशीही कहानी.या कहाणीचा नायक आहे सचिन कराळे. संपूर्ण नेर शहरात त्याला जांभा या नावाने ओळखले जाते.

Independent Candidate win Nagar Parishad Election
Nagar Palika Election Result: नंदुरबारमध्ये भाजपचा फुसका बार ! नवापूर आणि तळोदा नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा

गेल्या अनेक दिवसापासून जांभा राजकारणात सक्रिय आहे. भाजप सारख्या पक्षात त्याने आपले बहुमूल्य योगदान संघटन कौशल्यासाठी दिले आहे. मात्र भाजपाने त्याला यावेळी उमेदवारी दिली नाही. महायुतीच्या राजकीय घडामोडीत त्याची उमेदवारी ऐनवेळी रद्द झाली. मात्र कुठल्याही परिस्थितीत लढायचेच हा चंग जांभा याने यावेळी बांधला होता. त्यासाठी सर्वसामान्य वंचित घटकातील त्याचे सर्व मित्र पुढे सरसावले आणि नेर नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक एक मध्ये त्याची उमेदवारी दाखल करण्यात आली.

वार्ड क्रमांक एक मधून मागील पंधरा वर्षापासून प्रतिनिधित्व करणारे सुभाष भोयर यांच्याशी त्याची थेट लढत झाली. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशीही लढत झाली.त्यामुळे सर्वसामान्य गरीब माणसांनीच जांभाची ही निवडणूक हाती घेतली होती. नामांकन दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासूनच जांभाच्या विजयाची मतदार खात्री देत होते.जांभा ला स्वतःचे धड घर नाही. तो रुग्णसेवक म्हणून नेर तालुक्यात काम करतो.

कोणीही अडला नडला रुग्ण असला की तो रुग्णवाहिकेत त्याला यवतमाळ येथे घेऊन जातो व प्राथमिक उपचार होईपर्यंत तिथेच थांबतो. रात्री अपरात्री रुग्णांसाठी धावपळ करणे हा सेवाभाव यावेळी त्याच्या कामी आला .नेरच्या ग्रामीण रुग्णालयातच त्याची रात्र जात असते. अलीकडे ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या एका हॉटेलमध्ये त्याचा मुक्काम असायचा.

.त्याचा मित्रपरिवार प्रचंड असल्यामुळे शहराच्या विविध भागात त्याचे वाढदिवसही साजरे होतात.अगदी कफल्लक असलेल्या जांभा च्या जेवणाची व्यवस्था ही त्याचे मित्रच करतात. त्याच्या या सामाजिक धडपडीला राजकीय पाठबळ मिळावे म्हणून यंदा त्यांनी जांभालाच नेर नगर परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करायला लावले. खिशात खडकु नाही मात्र मित्रांचा गोतावळा अधिक असल्यामुळे याच संपत्तीच्या बळ्यावर त्याने शिंदे सेनेच्या सुभाष भोयर या तगड्या उमेदवाराला आसमान दाखवले.

वरवर शिंदे सेनेचा विजय पक्का वाटत असताना आत मधून मात्र जांभाने जबरदस्त फिल्डिंग लावली होती. कुठलाही मोठा नेता त्याच्या पाठीशी नव्हता. कुण्या नेत्याची सभाही जांभा साठी झाली नाही. मात्र रात्री बे रात्री लोकांचे आशीर्वाद घेणे एवढेच त्याचे प्रचाराचे तंत्र होते. आणि त्यामुळे प्रचंड अशी सहानुभूती त्याच्या पाठीशी होती .या बळावरच त्याने नेर नगर परिषदेच्या निवडणुकीत शिंदे सेनेसारख्या प्रस्थापित राजकीय नेत्याला धूळ चारली . त्याचे या विजयामुळे नेर शहरात अपेक्षित आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सर्वसामान्य कुटुंबातील एखाद्या धडपडणार्‍या कार्यकर्त्याला लोक कसे डोक्यावर घेतात हे पहिल्यांदाच नेर शहरात घडत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com