Nagar Palika Election Result: नंदुरबारमध्ये भाजपचा फुसका बार ! नवापूर आणि तळोदा नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा

Nandurbar Civic Poll Results: नंदुरबारमधील दोन नगरपालिकेत भाजपला मोठा धक्का मिळालाय. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने नवापूर आणि तळोदा नगरपालिका जिंकून ऐतिहासिक विजय मिळवलाय.
Nandurbar  Nagar Palika Election Result
NCP supporters celebrate after Ajit Pawar group wins Navapur and Taloda municipal councils in Nandurbar district.saam tv
Published On
Summary
  • नंदुरबार जिल्ह्यात भाजपचा मोठा पराभव, राष्ट्रवादीची सरशी.

  • नवापूर आणि तळोदा नगरपालिकांवर अजित पवार गटाचा झेंडा फडकला.

  • तळोदा नगरपालिकेत भाग्यश्री योगेश चौधरी ३४२८ मतांनी विजयी.

राज्यातील सर्व २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहे. अनेक जागांवरील निकाल हाती आले आहे. यातील बहुतेक जागांवरील निकाल आश्चर्यकारक ठरतेली. महायुतीतील मोठा भाऊ म्हणून मान मिरवणाऱ्या भाजपला अनेक ठिकाणी पराभवाची चव चाखावी लागलीय. नंदुरबारमध्ये भाजपचा मोठा पराभव झालाय. येथील भावपूर्ण नगर, तळोदा आणि शहादा येथे अजित पवार गटाने विजय मिळवत भाजपला धूळ चारलीय.

शहादा तळोदा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेश पाडवी यांच्या मतदारसंघातील दोघं पालिकेमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे.तळोदा नगरपालिकेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी विजयी झाल्या आहेत. सातव्या फेरीच्या शेवटी त्यांनी ३४२८ मतांनी विजय मिळवलाय.

Nandurbar  Nagar Palika Election Result
Ausa Municipal Council Election: औसामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस 'बाजीगर'; काँग्रेससह भाजपला मोठा झटका, नगराध्यक्ष पद अजित पवारांकडेच

नवापूरमधील भावपूर्ण नगर नगरपरिषदेत राष्ट्रवादी अजित पवार गटानं विजय मिळवलाय. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव यांचा अंतिम फेरीत ३८२८ मतांनी विजय मिळवलाय. इतिहासात पहिल्यांदाच नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर आणि तळोदा नगरपालिकेवर राष्ट्रवादीच्या हाती सत्ता आलीय. जिल्ह्यातील दोन नगरपालिकांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा झेंडा फडकलाय.

Nandurbar  Nagar Palika Election Result
Parbhani Nagarpalika Result: धनंजय मुंडेंच्या भावुक सभेनं जिंकलं, मुंडेंच्या बहिणीचा दणदणीत विजय, भाजपला धक्का

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत झाली. यात जनता विकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी १०४१ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. निवडणूक निकालानुसार अभिजीत पाटील यांना एकूण १८,७९८ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे मकरंद पाटील यांना १७,७५८ मते प्राप्त झाली. मतमोजणीदरम्यान दोन्ही उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळाली, मात्र अखेरीस जनता विकास आघाडीने बाजी मारलीय. शहादा नगरपालिकेतील २९ नगरसेवकांच्या जागांपैकी भारतीय जनता पार्टीने २० जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com