Marathich Bolu Saam TV Saam TV
महाराष्ट्र

महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी एकत्र याच; 'मराठीच बोलू' चळवळीत व्हा सहभागी

Marathich Bolu Saam TV : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘मराठीच बोलू’ अशी चळवळ आम्ही सुरू केली आहे. मराठी भाषा आणि अस्मिता जपण्यासाठी यात सर्वांनी सहभागी व्हावे.

Namdeo Kumbhar

Marathi language awareness campaign Maharashtra Day : पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी, हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी..सुरेश भट यांच्या काव्यातील ओळी आठवल्या. आज १ मे, महाराष्ट्र दिनाला मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलण्याची गरज आहे. कारण मराठी, महाराष्ट्रासाठी अनेकांनी बलिदान दिले. त्याच महाराष्ट्राच्या मातीत आज मराठी भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकलाय. मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या अनेक शहरांमध्ये मराठी माणसावर अन्याय होतोय, पण आपण काही पेटून उठत नाही. सरकारकडून मराठीसाठी प्रयत्न केले जात आहेत. पण आपणही यात सहभागी व्हायला हवे. मराठी आणि महाराष्ट्रासाठी पुन्हा एकदा एका चळवळीची गरज आहे. त्यासाठीच साम टीव्हीने पुढाकार घेत आजपासून नवी चळवळ सुरू केली आहे.

आपल्याच महाराष्ट्रात आज मराठी माणसाला परकेपणा जाणवू लागला आहे. लोकलच्या प्रवासात, रिक्षावाल्यासोबत बोलताना किंवा सार्वजनिक ठिकाणी बोलताना, अनेकदा मराठी भाषेची गळचेपी होते. याला काहीसे आपणही जबाबदार आहोतच की.. आपण महाराष्ट्रात राहून प्रवासात समोरच्याला मराठीत बोलत नाही. आपणच हिंदी, इंग्रजीमध्ये बोलतो. या भाषांना विरोध नाही. पण मराठीचा अभिमान हवाच. आणि तो आपणच जपायला हवा. पण आपणच मराठीत बोलणं टाळलं, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढलो नाही तर परप्रांतीय फोफावल्याशिवाय राहणार नाहीत. ते तुमच्या मानगुटीवर बसतील, काही शहरात तशी परिस्थितीही झाली आहे. महाराष्ट्रातील काही शहरात, परिसरात मराठी भाषिकांची संख्या कमी अन् इतर भाषिकांचे वर्चस्व जास्त दिसतेय. त्यांना विरोध नाही, पण ते मराठीचा अपमान, मराठी माणसाची गळचेपी करत असतील तर त्याला विरोध करायलाच हवा. हीच परिस्थिती बदलण्यासाठी आणि मराठीचा स्वाभिमान, अस्मितेसाठी 'साम टीव्ही'ने 'मराठीच बोलू' अशी चळवळ सुरू केली.

नोकरी-व्यवसायानिमित्त महाराष्ट्रात येणारे परप्रांतीय येथील संस्कृतीशी एकरूप होत नाहीत. ते आपलीच भाषा लादण्याचा प्रयत्न करतात. दुर्दैवाने आपणच, समोरच्याला समजून घेण्यासाठी आपली मातृभाषा मराठी बाजूला ठेवतो अन् हिंदी किंवा इतर भाषेत संवाद साधतो. यामुळे परप्रांतीयांची मुजोरपणा वाढतो आणि मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळते. हीच 'दुय्यम' होण्याची भावना मुळापासून उखडून टाकण्याची वेळ आता आली आहे.

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. महाराष्ट्राची भाषा मराठी. आपल्या जगण्याची, आपल्या संस्कृतीची, आपली मातृभाषा ही मराठीच... महाराष्ट्रात मराठी भाषेच्या अस्मितेसाठी गरज आहे मराठीतून संवाद साधण्याची. मराठी भाषेचा हा वारसा अभिमानानं जपण्यासाठी साम टीव्हीने आजपासून 'मराठीच बोलू' ही चळवळ सुरू केली. आज महाराष्ट्र दिन आहे, त्या निमित्ताने आपण यापुढे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मराठीच बोलावं, असे आवाहन साम टीव्हीकडून केले जातेय. कारण तुम्ही मराठीत बोललात तर बाहेरून येणारे इतर भाषिकही मराठी बोलण्याचा प्रयत्न करतील. आमच्या 'मराठीच बोलू' चळवळीत सर्वजण सामील होऊयात.

महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी भाषेचा वारसा, अस्मिता जपण्यासाठी आम्ही घेतलेल्या भूमिकेला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. मराठी म्हणून तुम्हीही यात सहभागी व्हा. जर आपण आज आपल्या भाषेसाठी उभे राहिलो नाही, तर पुढच्या पिढीला आपली ओळख सांगणे कठीण होईल. त्यामुळे आजपासून मराठीतच बोला. मराठीचा अभिमान बाळगा... जय महाराष्ट्र!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Real vs Fake Watermelon: कलिंगड खरं की खोटं कसं ओळखाल?

Maharashtra News Live Update : आर्थिक फसवणूक प्रकरणात अशोक खरातला ४ दिवसांची कोठडी

Marriage Pressure Turns Fatal: बुलढाण्यात धक्कादायक घटना; लग्न न जुळल्याच्या नैराश्यातून २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या

Western Railway News : विरार-डहाणूकरांसाठी मोठी बातमी, १५ डब्यांची लोकल धावली, तिकीट किती? कोणते थांबे असणार?

Breast Cancer Signs And Symptoms: महिलांनो, फक्त गाठ म्हणजे 'ब्रेस्ट कॅन्सर' नाही, तर या 5 लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

SCROLL FOR NEXT