Karad North Assembly Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Saam Exit Poll, Karad Vidhansabha : शरद पवार यांच्या पक्षाचं वर्चस्व असलेल्या कराड उत्तर मतदारसंघात भाजपचा पराभव होण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार येथे पुन्हा बाळासाहेब पाटील यांची जादू पुन्हा चालणार असल्याचं दिसत आहे.

Saam Tv

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाली आहे. तर त्यांच्याविरोधात भाजपचे मनोज घोरपडे उभे आहेत. 20 तारखेला मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोलची आकडेवारी यायला सुरुवात झाली आहे. यात कराड उतरमध्ये भाजपला हार मानवी लागू शकते, असं दिसत आहे.

कराड उत्तर मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाचं वर्चस्व आहे. त्याचबरोबर बाळासाहेब पाटील यांचा देखील या भगत दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे सकाळच्या एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार या ठिकाणी संभाव्य आमदार म्हणून बाळासाहेब पाटील यांच्या नावाला पसंती मिळत आहे. त्यामुळे शरद पवार यांचा हा गड राखला जाण्याची शक्यता आहे.

भाजपने या मतदारसंघासाठी पूर्ण ताकद लावली आहे. महायुती आणि भाजपकडून इच्छुक असलेल्याना भाजपने एकत्र केलं आहे. त्याचबरोबर खासदार उदयनराजे आणि आमदार शीवेन राजे यांची देखील ताकद एकत्र केल्याने मनोज घोरपडे यांनी बाळासाहेब पाटील यांना मोठं आव्हान दिलं आहे.

असं असूनही बाळासाहेब पाटील यांचा या मतदारसंघात असलेला जनसंपर्क आणि साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राच्या जिवावर बाळासाहेब पाटील पुन्हा एकदा याठिकाणी निवडणून येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT