sangli Assembly constituency Sudhir Gadgil vs Prithviraj Patil saam tv
महाराष्ट्र

Saam Exit Poll : सांगलीत भाजप मारणार बाजी? एक्झिट पोलमध्ये कौल कुणाला?

Sangli Vidhan Sabha Exit Poll 2024 : सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपचे पारडे जड आहे. भाजपचे सुधीर गाडगीळ यांच्याकडे संभाव्य आमदार म्हणून बघितले जाते.

Nandkumar Joshi

विजय पाटील, सांगली

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात आला आहे. २० नोव्हेंबरला मतदान झालं आहे. तर २३ तारखेला निकाल आहे. तत्पूर्वी सकाळ समूहाच्या साम टीव्हीने घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये सांगली मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून येऊ शकतात. भाजपकडून सुधीर गाडगीळ तर, काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील हे रिंगणात होते.

निवडणूक रंगतदार झाली. ही खरं तर काट्याची टक्कर मानली जात होती. पण एक्झिट पोलमध्ये भाजपच्या सुधीर गाडगीळ यांना झुकतं माप दिल्याचं दिसतं.

सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून बंडखोरी झाली होती. पण भाजपने ही बंडखोरी मोडून काढली आहे. भाजपने विद्यमान आमदार गाडगीळ यांना उमेदवारी दिली. तर बंडखोरांना गाडगीळांच्या पाठिशी राहण्याचे आवाहन केले.

भाजपचे नेते सुधीर गाडगीळ यांच्या पाठिशी राहतील असा विश्वास व्यक्त केला. तर जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली असून, त्या अपक्ष आहेत. महाविकास आघाडीचे पृथ्वीराज पाटील हे रिंगणात होते. त्यामुळे तिहेरी लढत सांगलीत झाली. काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीचा फायदा भाजपला झाल्याचे दिसून आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे गाडगीळ हे संभाव्य आमदार असतील असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. प्रत्यक्ष २३ तारखेलाच निकाल लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Why do Medu Vada have a hole: मेदू वड्याला मधोमध होल का पाडतात? जाणून घ्या रंजक कारण

Maharashtra Politics: कालचे वैरी आजचे मित्र? शिंदेसेना आणि ठाकरेंसेना एकत्र येणार? VIDEO

Solapur Tourism: खरंच माथेरान, महाबळेश्वर विसराल! सोलापूरपासून 123 km दूर असलेल्या 'या' हिल स्टेशनवर एकदा जाच

Maharashtra Live News Update: अंबरनाथ रेल्वे स्थानकात गर्डर लॉंचिंग; मध्यरेल्वेचा आज रात्री ब्लॉक

Mix Dal Dosa Recipe: घरीच बनवा मिक्स डाळींचा पौष्टिक डोसा; नाश्त्यासाठी हेल्दी अन् टेस्टी ऑप्शन

SCROLL FOR NEXT