Maharashtra exit polls : Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra exit polls : उस्मानाबाद विधानसभेत कुणाच पारडं जड? कैलास पाटील गड राखणार? पाहा एक्झिट पोल

osmanabad assembly constituency, Saam exit polls : उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढाई झाली. या लढाईत ठाकरे गटाने बाजी मारल्याचं बोललं जात आहे.

Vishal Gangurde

मराठवाड्यातील दुसरा मतदारसंघ असणाऱ्या उस्मानाबादची जोरदार चर्चा होती. या उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढाई झाल्याचं बोललं जात आहे. सकाळ समूहाच्या एक्झिट पोलनुसार, या मतदारसंघात ठाकरे गटाचं पारडं जड असण्याची शक्यता आहे.

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढाई झाली. मागील विधानसभा निवडणुकीत कैलास पाटील यांनीच बाजी मारली होती. शिवसेना फुटीनंतर कैलास पाटील यांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली. या मतदारसंघात शिंदे गटाकडून अजित पिंगळे यांना उमेदवारी मिळाली होती.

ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा सामना मतदारसंघात झाला. या सामन्यात ठाकरे गटाच्या कैलास पाटील यांनी बाजी मारल्याचं दिसतंय. कैलास पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत मतदारसंघाची बांधणी केली. लोकसभेत ओमराजे निंबाळकर यांची प्रचारयंत्रणा कैलास पाटील यांच्याकडे होती. त्यामुळे या मतदारसंघात त्यांना मोठा वेळ मिळाला. अजित पिंगळे हे याआधी भाजपमध्ये होते. या मतदारसंघातील महायुतीतील अंतर्गत नाराजीचा फायदा कैलास पाटील यांना झाल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT