Edible Oil Saam TV
महाराष्ट्र

Russia-Ukraine war: रशिया-युक्रेन युद्धाचा सर्वसामान्यांना फटका; खाद्यतेलाचे दर भिडले गगनाला

युद्धाच्या धास्तीने गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मंदीचे वातावरण आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिद्धेश म्हात्रे -

रायगड : रशिया आणि युक्रेन (Russia and Ukraine) मध्ये सुरू झालेल्या युद्धाचे सर्व जगावरती परिणाम होत आहेत. त्यामध्ये जगभरातील शेअर बाजाराला बसला आहे. तसंच कच्चा तेलाच्या किंमती देखील वाढल्या आहेत. दरम्यान, कोरोना (Corona) संकटानंतर सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian economy) या मंदीच्या वातावरणाचा फटका बसण्याची चिन्ह दिसत आहेतच मात्र या युद्धाचा सर्वसामान्यांच्या जीवणावर देखील परिणाम होणार आहे.

कारण या युद्धामुळे दैनंदिन वापरातील खाद्यतेलाच्या (Edible oil) किमतींमध्ये मोठी वाढ होत आहे. युक्रेनमधून मोठ्याप्रमाणात सनफ्लॉवरच्या कच्या तेलाची आयात केली जाते. मात्र युद्ध सुरू झाल्याने ही आयात थांबण्याची शक्यता असून यामुळे सनफ्लॉवर तेलाच्या किंमती गगनाला भिडणार आहेत.

मागील काही दिवसातच 2000 रुपयांना भेटणारे सनफ्लॉवर तेल आता 2300 रुपयांवर पोहोचले आहे. येत्या काही दिवसात हे युद्ध न थांबल्यास या किंमतीमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

SCROLL FOR NEXT