Bhagat Singh Koshyari: 'राज्यपाल हिमालयात असावे, तिकडे सर्वांना गुरु लागतो'

'छत्रपती शिवरायांना कुठल्या गुरुची गरज नव्हती, ते स्वयंनिर्माते होते, ते स्वयंप्रकाशित होते.'
Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh KoshyariSaam TV
Published On

नागपूर : छत्रपती शिवरायांना (Chhatraptai Shivaji Maharaj) कुठल्या गुरुची गरज नव्हती, ते स्वयंनिर्माते होते, ते स्वयंप्रकाशित होते. स्वयंप्रकाशित राजे असल्याने त्यांना गुरु लागत नाही. मात्र हिमालयात सर्वांना गुरु लागतो, राज्यपाल तिकडे असावे असा खोचक टोला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावरती लगावला आहे. जर गुरु असते तर एखादा धडा गुरुवरंही असता, पण सर्व धडे शिवरायांवर आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांचे वक्तव्य शिवरायांचा अपमान करणारे असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, निवडणूक आयोगाने याचिका टाकल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात होणारी ओबीसी आरक्षणावरील (OBC Reservation) सुनावणी पुढे ढकलली आहे ती आता बुधवारी होणार असून तो निकाल ओबीसींच्या बाजूनं लागेल अशी आशा असल्याचं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

युक्रेन भारतीय विद्यार्थ्यांना मदत करत नाही.

Bhagat Singh Koshyari
'एसटी संप जास्त ताणू नका',राजेश टोपे यांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

भारतातून युक्रेनमध्ये (Ukraine) २५ ते ३० हजार मुलं आहेत. ४० किमी प्रवास करुन गेल्यानंतर थंडीत ते उघड्यावर झोपले दोन विमान आले म्हणजे सर्व विद्यार्थी आले असं नाही. विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागेल महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सरकारी खर्चाने घरांपर्यंत पोहोचवणार केंद्र सरकारने ॲापरेशन गंगा सुरु केलं, ते वाहून जाता कामा नये. केंद्र सरकारने प्रत्येक विद्यार्थ्यांना परत आणावे पोलंडचे राजदूत मदत करत नाही, त्यांना ताकीद देण्याची गरज आहे. ९०० लोक आले म्हणजे सर्व झालं असं नाही, ३० हजार लोकांमध्यून फक्त ९०० लोकं आलेत. नाटो मध्ये भारतानं समर्थन न केल्याने युक्रेन भारतीय विद्यार्थ्यांना मदत करत नाही. याकडे त्वरीत लक्ष घालणं गरजेचं असल्याचही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com