इस्त्रायल-इराण युद्धात अमेरिकेनं इराणला इशारा दिला. त्यात आता रशियानं अमेरिकेला युद्धात उतरू नये, असा इशारा दिलाय. मात्र रशिया इराणच्या मदतीसाठी मैदानात का उतरलीय? मध्य पूर्वेतला तणाव वाढल्यास काय परिणाम होणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
इस्त्रायल- इराण युद्ध आता एका निर्णायक वळणावर पोहोचलयं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धात सहभागी व्हायचं का नाही? हे ठरवण्यासाठी 2 आठवड्यांचा कालावधी निश्चित केलाय. याआधी ट्रम्प यांनी इराणला काय इशारा दिला होता. पाहूयात.
इराणचा सर्वोच्च नेता कुठे लपला आहे? हे अमेरिकेला चांगलचं ठाऊक आहे. त्याला सहजपणे लक्ष्य केले जाऊ शकते. मात्र अमेरिका असं करणार नाही. मात्र इराणने इस्रायली नागरिकांवर आणि अमेरिकन सैन्यावर हल्ला करण्याची चूक कदापी करू नये.
ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर रशियानंही इस्त्रायल- इराण युद्धात उडी घेतलीय. रशियन परराष्ट्र मंत्रालयानं अमेरिकेच्या भूमिकेला आंतराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन म्हटलयं. तसचं अमेरिकेच्या भूमिकेमुळेच मध्य पूर्वेत तणाव वाढत असल्याची टीका केली आहे. त्यात रशियाने इराणला एस-300 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आणि इतर लष्करी तंत्रज्ञानही पुरवलेत. त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची इस्त्रायल- इराण युद्धात काय भूमिका आहे.. पाहूयात.
इस्रायलसोबतच्या संघर्षामुळे इराणमध्ये सत्तांतर होण्याची रशियाला चिंता आहे. कारण इराणमधील सत्तांतर पश्चिम आशियात रशियाला कमकुवत करू शकतं. त्यामुळे इराण कमकुवत झाल्यास अमेरिका आणि इस्रायलचं वर्चस्व वाढेल. यामुळेच अमेरिकेच्या लष्करी कारवायांविरोधात रशियानं युद्धात एन्ट्री घेण्याचा इशारा दिलाय.
अमेरिकेच्या निर्बंधांना न जुमानता चीननं आधीच इराणला आर्थिक आणि तांत्रिक मदत पुरवलीय. चीन आणि उत्तर कोरियानेही इस्त्रायल- इराणमध्ये युद्धबंदीची गरज अधोरेखित केलीय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दबाब पाहता अमेरिकेला इराणविरोधात युद्धात उतरणं कठीण जाणार आहे, हे निश्चित.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.