Pune-Nashik Highway Saam Tv
महाराष्ट्र

Pune-Nashik Highway : पुणे-नाशिक महामार्गावर अपघाती मृत्यूच्या प्रमाणात होणार घट, ग्रामीण रुग्णालय-ट्रॉमा सेंटरला मंजुरी

Pune-Nashik Highway News : राज्य सरकारच्यावतीने अपर सचिव कविता पिसे यांच्या सहीने आदेश शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्रविण वाकचौरे

Ahmednagar News :

संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील बोटा येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरला मंजुरी मिळाली आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. २५ जुलै २०२३ रोजी पावसाळी अधिवेशनादरम्यान डोळासणे / बोटा (संगमनेर) व वावी (सिन्नर) येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी सत्यजीत तांबे यांनी केली होती.

आता या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी करून हिरवा कंदिल दिला असून पुणे - नाशिक महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळणार आहे. ३० खाटांच्या या नियोजित ग्रामीण रुग्णालयासाठी शासन स्तरावरून स्वतंत्र पदनिर्मिती देखील केली जाणार आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्य सरकारच्यावतीने अपर सचिव कविता पिसे यांच्या सहीने आदेश शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणून बोटा प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करण्यास शासनाने मंजुरी दिली.

बोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विस्तीर्ण आवारात ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय साकारण्यात येईल. त्यासाठी जागा अधिग्रहण, नवीन इमारत बांधकाम व पदनिर्मितीबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाईल, असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

महामार्गांवरील अपघातांमधील जखमींचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी कधी करणार, अशी मागणी सातत्याने केली होती. अखेर वावी येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर तसेच बोटा येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर यांना मंजुरी मिळाली असून लवकरच कामाला सुरूवात होईल.

बोटा येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर मंजुरीबाबत सरकारने शासन निर्णय जारी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मनापासून आभार मानतो, अशी माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली.

अपघातग्रस्तांना मिळणार तातडीने उपचार

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. बोटा व वावी या दोन्ही ठिकाणी ट्रॉमा सेंटर मंजूर झाल्यामुळे या भागातील अपघातग्रस्त नागरिकांना तातडीने उपचार मिळतील. त्यांचे अनमोल आयुष्य वाचू शकेल. याकामी मला खारीचा वाटा उचलता आला, याचे मला समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

Dahi handi : एक गाव-एक दहीहंडी! पण फोडण्याची हटके पद्धत, इथे विहिरीत उडी मारून फोडली जाते दहीहंडी; Video

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; पुण्यात घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीत शोककळा

SCROLL FOR NEXT