Mohan Bhagwat SaamTv
महाराष्ट्र

Mohan Bhagwat: भारताचा आर्थिक विकास होतोय, पण गरीब- श्रीमंत यांच्यातील दरी वाढली: मोहन भागवत

RSS Vijayadashmi Program: नागपूरच्या रेशिमबागमध्ये आरएसएसचा विजयादशमी सोहळा पार पडला. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी यावेळी सर्वांना संबोधित करत आत्मनिर्भर बना असे आवाहन केले.

Priya More

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विजयादशमी साजरा करण्यासाठी आरएसएसचे सर्व प्रमुख आणि सदस्य हे नागपूरमधील रेशीमबागमध्ये एकत्र आले होते. या कार्यक्रमाला आरएसएस प्रमुख मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित आहेत. मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी सर्वांना संबोधित करत असताना मोहन भागवत यांनी देशासह देशभरातील सर्व घडामोडींवर भाष्य करत सर्वांना एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले. जगाच्या व्यवस्थेमध्ये परिवर्तन गरजेचे आहे. जगाला एका मार्गावर आणणं गरजेचे असल्याचे त्यांनी सांगतिले.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले की, 'भारतात पहलगाममध्ये हल्ला झाला आणि धर्म विचारून मारण्यात आले. आपल्याला आपल्या सुरक्षेसाठी अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्य आणि सरकारने सडेतोड उत्तर दिले. मागचे वर्ष आमच्या समोर नवीन आणि विविध आव्हाने घेऊन आले. मागच्या वर्षी पहलगाम हल्ला झाला आणि आपल्या सैन्याने त्याचे उत्तर दिले. ही घटना शिकवणारी ठरली. सर्वप्रति मित्रभाव ठेवल्यास आपल्या सुरक्षेसाठी जागृक आणि ताकदवान बनले पाहिजे. काही देशांच्या भूमिकांवरून आपले मित्र कोण आणि शत्रू कोण हे देखील स्पष्ट झाले.'

मोहन भागवत यांनी यावेळी अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, 'भारतामध्ये काही अविचारी लोक सुद्धा आहेत. यावर समाज आणि शासन-प्रशासनाने योग्य योजना राबवाव्या लागतील. सुविधांचा अभाव असल्याने असे लोक चुकीचा आश्रय घेतात. आर्थिक क्षेत्रात आपण पुढे जात आहोत. आर्थिक उद्योजकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. काही दोष असूनही आर्थिक सामर्थ्य काही प्रमाणात स्पष्ट होते. अमेरिकेने नवीन टॅरिफ लावला. यासाठी प्रचलित पद्धतीवर निर्भरीत राहू नये. ही निर्भरता केव्हा बदलेल हे माहित नाही. पण स्वदेशी आणि स्वावलंबी जीवन जगणे आवश्यक आहे. तरीही आंतरराष्ट्रीय संबंध जपताना सक्ती करू नये.'

तसंच, 'भारत आर्थिक विकास करत आहे. पण गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत चालली आहे. भौतिक विकासासोबत नैतिक विकास देखील महत्त्वाचा आहे. परिस्थिती अशी आहे की, सुखसुविधा वाढल्या, ज्ञान प्रगती झाली, पण परिवर्तन आणि विज्ञानाच्या गतीमुळे मनुष्यजीवनात ताळमेळ बसत नाही. नागरी जीवनात अत्याचार वाढले आहेत. याचं निराकरण होताना अपयश आले आहे. सध्या घातक विचारधारेचा प्रसार झाला आहे. भारत काही उपाययोजना करेल अशी अनेकांना अपेक्षा आहे. भारताकडून जगाचं विश्वास प्रमाण सतत वाढत आहे.', असे मोहन भागवत यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: जांभळ्या साडीत प्राजक्ताचं मराठमोळ सौंदर्य...

Jalgaon : मासेमारीसाठी गेलेल्या इसमाचा तलावात बुडून मृत्यू; जळगांवच्या मेहरूण तलावातील घटना

Munawar Farooqi: मुनव्वर फारुकीला जीवे मारण्याचा प्लॅन, दिल्लीतून दोन शूटर्सना अटक; पोलिसांनी सांगितला संपूर्ण प्रकार

निलेश घायवळचा नवा प्रताप! त्याच्या अन् बायकोच्या नावे ४ मतदान ओळखपत्र, एक पुण्यात तर दुसरे नगरमध्ये; नावात बदल करत...

Road Accident: भारतात सर्वात जास्त रस्ते अपघात कोणत्या शहरात नोंदवले जातात? सर्वाधिक धोकादायक शहर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT