दिलीप कांबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी
Rose Day : आज रोझ डेच्या निमित्ताने व्हॅलेंटाइन वीकला सुरुवात झाली आहे. आपल्या मनातील प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी आज लोक प्रियजनांना गुलाब देतात. या संपूर्ण आठवड्यात गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते. पण यावर्षी मागणी कमी झाल्याने गुलाबाच्या दरात घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे.
मावळातील गुलांबाना विदेशात मोठी मागणी आहे. तेव्हा संपूर्ण मावळातून परदेशात फुलांची निर्यात केली जाते. व्हॅलेंटाइन वीकच्या निमित्ताने फुल उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लगबग असते. या पार्श्वभूममीवर शेतकरी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच कामाला सुरुवात करतात. २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी हा जागतिक बाजारपेठेमध्ये फुलांची निर्यात होण्याचा कालावधी असतो.
पण यावर्षी खूप पाऊस झाला आणि अपेक्षेप्रमाणे थंडी पडली नाही. याचा परिणाम फुल उत्पादनावर झाला. जे फुल ५० ते ५५ दिवसांनंतर येते, ते फुल ४० दिवसातच उमलले. त्यामुळे फुल निर्यातीच्या वेळेआधीच मोठ्या प्रमाणात गुलाबाच्या फुलांचे उत्पादन झाले. फुले लवकर उमलल्याने त्यांची विक्री मिळेल त्या भावात स्थानिक बाजारपेठांमध्येच करावी लागली अशी माहिती समोर आली आहे.
या सर्व प्रकाराचा परिणाम गुलाबाच्या दरामध्ये झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे रोझ डेलाच गुलाबाचा भाव घसरला आहे. यावर्षी व्हॅलेंटाईन वीकसाठी मावळमधून ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड, सिंगापूर, दुबई या देशात गुलाबांची निर्यात केली जाणार आहे. यंदा १२ ते १५ लाख गुलाब परदेशात पाठवले जाणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.