Rohit Pawar saam tv
महाराष्ट्र

Rohit Pawar News: सरकार झोपलंय का? पुण्यात तरुणीवरील हल्ल्यानंतर रोहित पवारांची टीका

Rohit Pawar's reaction : महाराष्ट्रात सातत्त्याने अशा घटना घडत आहेत. त्यामुळे सरकारचा कुठेतरी कंट्रोल राहायला नाही असं दिसतंय, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

Chandrakant Jagtap

>> अक्षय बडवे, साम टीव्ही

Rohit Pawar's reaction on attack on young girl in Pune: दर्शना पवार हत्येचं प्रकरण ताजं असतानाच पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पुणे हादरलं आहे.

याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणाले, ही घटना अतिशय चुकीची आहे. महाराष्ट्रात सातत्त्याने अशा घटना घडत आहेत. त्यामुळे सरकारचा कुठेतरी कंट्रोल राहायला नाही असं दिसतंय, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

रोहित पवार म्हणाले, राज्यातील पोलिसांचा वेळ व्हीव्हीआयपींना सुरक्षा पुरवण्यात जात आहे. जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा आहे, अशा सभांमुळे पोलिस व्यस्त आहेत. त्यामुळे अशा घटना घडलत आहे. पुरोगामी आणि अतिशय ताकदवान असलेल्या महाराष्ट्राला हे शोभत नाही. हे सगळं घडत असताना सरकार झोपलं आहे असं वाटतंय, असं म्हणत रोहित पवारांनी सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, मोदी साहेब हे एक मोठे नेते आहेत. देश चालवताना सगळी माहिती त्यांच्याकडे नसेल. राज्यातील भाजप नेत्यांनी जी माहिती दिली, त्यावर पीएमओने अभ्यास केला पाहिजे. (Marathi Tajya Batmya)

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, कुठेतरी सुप्रिया ताई यांना साहेबांनी संधी दिली याची चर्चा पीएमओमध्ये झाली असावी, म्हणून ते बोलले असतील. आत्तापासून ते बोलत असतील तर राज्यात भाजपसमोर राष्ट्रवादीचच आव्हान राहील असं दिसतंय. पंतप्रधान मोदी यांना विनंती आहे की अमेरिकेचा दौरा चांगला झाला, देशातील राज्य फक्त गुजरात नाही. महाराष्ट्राला गुंतवणूक द्यावी, असे देखील रोहित पवार म्हणाले. (Latest Political News)

बीआरएसचं धोरण शिंदेंसारखं - रोहित पवार

रोहित पवार यानी केसीआर यांच्यावरही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, तेलंगणाच्या बीआरएस पार्टीचं धोरण एकनाथ शिंदे यांच्यासारखं दिसतं. महाराष्ट्रात ते आले चांगली गोष्ट आहे, ३०० गाड्या घेऊन आले म्हणून ताकद वाढणार नाही. आर्थिक मदत मिळेल या गोष्टीला भुलून काही लोकं त्यांच्याकडे जात असतील असे रोहित पवार म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: मराठवाड्यात ऑरेंज आणि यलो अलर्ट,नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Trimbakeshwar Jyotirlinga: हर हर महादेव! शेवटच्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी

Crime News : पुणे हादरले! कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल, १६ वर्षीय मुलीवर ५ वर्षे लैंगिक अत्याचार

Airtel Prepaid: Airtel कडून यूजर्सना सरप्राईज ऑफर! एअरटेल प्रीपेड ग्राहकांना Apple Music मोफत उपलब्ध

Rain Update: मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी, हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT