Rohit pawar on ajit pawar accident Saam tv
महाराष्ट्र

अजितदादांची राजकीय हत्या? रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ, VIDEO

rohit pawar news : अजित पवारांचा अपघात नाही तर हा घात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय.. मात्र रोहित पवारांचा रोख कुणाकडे आहे... आणि रोहित त्यानंतर राज्यात कसं वातावरण तापलंय... पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Bharat Mohalkar

अजित पवारांचा अपघात नाही तर 100 टक्के घात असल्याचा आरोप पहिल्यांदाच पवार कुटुंबातून करण्यात आलाय... एवढंच नाही तर रोहित पवारांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्यावेळी पूर्व विदर्भातील नेत्याचं नाव घेत मोठा गौप्यस्फोट केलाय....

खरंतर अजित पवारांचा 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला.... त्याच्या आदल्या दिवशी 27 जानेवारीला सायंकाळी 5.30 वाजता अजित पवार कारनं मुंबईहून पुण्याला जाणार होते... मात्र पूर्व विदर्भातील बड्या नेत्यानं दादांना फोन केला... आणि एका महत्वाच्या फाईलवर सही करावी लागेल, असं सांगितलं... मात्र ती फाईल मंत्रालयातून येईपर्यंत उशीर झाला आणि त्यामुळेच दादांना खासगी विमानाने बारामतीच्या दिशेनं जावं लागल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय..

या संपूर्ण प्रेझेंटेशनमध्ये रोहित पवारांनी पूर्व विदर्भातील नेत्याचं नाव घेतलं नाही.... मात्र दादांच्या मृत्यूनंतर रात्री बारामतीत प्रफुल्ल पटेलांनी आदल्या रात्री दादांशी फोनवर बोलणं झाल्याचं म्हटलं होतं...

आता पटेलांच्या वक्तव्यामुळे रोहित पवारांनी दावा केलेले पूर्व विदर्भातील नेते प्रफुल्ल पटेल होते का? याची चर्चा रंगलीय.. दुसरीकडे रोहित पवार पूर्व विदर्भातील नेत्याचा उल्लेख करुन थांबले नाहीत तर त्यांनी दादांच्या राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागारांचं कंत्राट रद्द करण्याबाबत चर्चा झाल्याचाही उल्लेख केलाय.

खरंतर रोहित पवारांच्या दाव्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार हे नरेश अरोरा असल्याचं म्हटलं जातय... आता रोहित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांनी अजित पवारांच्या घातपाताचा संशय व्यक्त करत सुरतेकडे बोट दाखवलंय...

आता सगळ्याच बाजूने अजितदादांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जातोय... त्यामुळे खरंच दादांची राजकीय हत्या झाली का? हत्येमागचा सुत्रधार कोण? हे संशयाचं वादळ शमवण्यासाठी दादांच्या मृत्यूची राजकीय दबावाविना न्यायालयीन चौकशी होण्याची गरज आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Heatwave : विदर्भ होरपळला! अकोल्यात उष्माघाताचा पाहिला बळी, ऑटोमध्ये आढळला मृतदेह

आजची मुलं खरंच “ऐकत नाहीत” की आपण त्यांना समजूनच घेत नाही? मानसशास्त्र काय सांगतं?

Liver pain symptoms: लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात नेमक्या कुठे होतात वेदना? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra News Live Update: अमरावतीतील परतवाडा इथल्या लैंगिक शोषण प्रकरणात एसआयटी स्थापन

Mosquito Agarbatti: अगरबत्ती की विषारी धूर? डासांना पळवणारी अगरबत्ती ठरतेय कुटुंबासाठी जीवघेणी; घरात वापरण्यापूर्वी या गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT