Rohit Pawar addressing the media while explaining the complete flight timeline of Ajit Pawar from Mumbai to Baramati. Saam Tv
महाराष्ट्र

अजितदादांचं विमान मुंबईहून बारामतीपर्यंत कसं पोहोचलं? पवारांनी सांगितली संपूर्ण टाइमलाइन....

Ajit Pawar Mumbai To Baramati Flight Timeline: अजित पवार मुंबईहून बारामतीकडे कसे गेले? विमानप्रवासाची संपूर्ण मिनिटागणिक टाइमलाइन रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत उघड केली.

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर विविध शंका आणि खळबळजनक दावे समोर येत होते. या पार्श्वभूमीवर दिवंगत अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती दिली. त्यांनी अजित पवार यांच्या मुंबई ते बारामती विमानप्रवासाचा संपूर्ण तपशील स्क्रीनवर दाखवत माहिती दिली. रोहित पवार यांनी सांगितलं की, अजित पवार सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. मुंबई–बारामती हे सुमारे २१० किमी अंतर असून हा प्रवास अवघ्या २७ मिनिटांत पूर्ण होणार होता. संबंधित विमान ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीचं असून ते बंबार्डियर कंपनीने अमेरिकेत तयार केलेलं आहे. हे विमान २०१० साली बनवण्यात आलं असून अतिशय वेगवान असून तब्बल ५१ हजार फूट उंचीपर्यंत जाण्याची क्षमता आहे. अंदाजे अजित पवार डाव्या बाजूला बसले असावेत. बॅगा आणि सामान बाजूला ठेवण्यात येतं, तसेच त्या भागात इंधनाच्या टाक्या असण्याचीही शक्यता असते.

व्हीएसआर कंपनीबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, विजयकुमार सिंग आणि रिमी सिंग हे या कंपनीचे पार्टनर आहेत. रोहित सिंग आणि विजयकुमार सिंग हे व्हिस्ता सेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे भागीदार असून, या कंपनीकडे लेअर जेट्सबाबत जवळपास मोनोपॉली आहे. सर्वाधिक विमाने ही व्हीएसआर कंपनीकडे असून त्यांनी स्वतःची ही कंपनी सुरू केली आहे. अपघाताच्या दिवसाची सविस्तर टाइमलाईनही रोहित पवारांनी सांगितली. सकाळी ७.०२ वाजता क्रू विमानाजवळ पोहोचले. कॅप्टनने आवश्यक तपासणी केली आणि एटीसीशी संवाद झाला.

मुंबई ते बारामती अजित दादांचा संपूर्ण प्रवासाचा टायमिंग

७.१० वाजता ‘ऑल ओके’ असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी पीएसओ विदीप जाधवही तिथे उपस्थित होते. ७.५० वाजता सर्वजण विमानात पोहोचले. ७.५६ वाजता मुंबई एटीसीशी संपर्क साधण्यात आला आणि सकाळी ८ वाजून १० मिनिटे ५१ सेकंदांनी विमानाने टेक-ऑफ केलं. ८.२२ ला विमान लोणावळ्याजवळ होतं, ८.२५ ला पुण्याच्या हद्दीत, त्यानंतर यवत-सुपे-जळगाव परिसरात मार्गक्रमण सुरू होतं. मात्र ८.४३ ते ८.४५ दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.सकाळी ९ वाजता ‘दादा गंभीर जखमी आहेत, रुग्णालयात आहेत आणि जिवंत आहेत’ अशी बातमी कानावर आली होती. मात्र त्यानंतर दादांच्या निधनाची बातमी समजली आणि मन पूर्णपणे सुन्न झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT