नालासोपाऱ्यात साक्षी ज्वेलर्सवर दरोडा; दिवसाढवळ्या सराफाची हत्या!
नालासोपाऱ्यात साक्षी ज्वेलर्सवर दरोडा; दिवसाढवळ्या सराफाची हत्या! चेतन इंगळे
महाराष्ट्र

नालासोपाऱ्यात साक्षी ज्वेलर्सवर दरोडा; दिवसाढवळ्या सराफाची हत्या!

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

नालासोपारा : नालासोपारा पाश्चिम परिसरातील साक्षी ज्वेलर्स वर आज सकाळी ११ च्या सुमारास दरोडा पडला. या दरोड्यात दोन अज्ञात हल्लेखोरांनी दुकानाचे मालक किशोर जैन यांची निर्घृण हत्या करून लाखोंचा ऐवज लुटून नेला. नालासोपारा पाश्चिमेच्या रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एसटी डेपो रोड वर साक्षी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे.

हे देखील पहा -

आज सकाळी दुकानाचे मालक किशोर जैन यांनी नेहमी प्रमाणे दुकान उघडले. सकाळची वेळ असल्याने दुकानात अन्य कर्मचारी नव्हते. जैन दुकानात पूजा करत असताना दोन अज्ञात इसम दुकानात शिरले. त्यांनी जैन यांच्याकडे लॉकरची चावी मागितली. मात्र जैन यांनी चावी देण्यास नकार दिला. यामुळे हल्लेखोरांनी जैन यांच्यावर चाकूने सपासप वार केले. लॉकर उघडता न आल्याने हल्लेखोर काही क्षणातच दुकानातील लाखो रुपयांचे दागिने घेऊन पसार झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या जैन यांचा जागीच मृत्यू झाला.

सराफा दुकानात दिवसाढवळ्या झालेल्या लूट आणि हत्येच्या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आम्हाला सीसीटीव्ही चित्रण मिळाले असून हल्लेखोरांचा शोधासाठी विविध पथके रवाना झाली आहे, अशी माहिती बोळींज पोलीस विभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी सांगितले. या दरोडेखोरांनी नेमका किती रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे, त्याची माहिती घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंढरपूर : नीरेच्या पाण्यासाठी 9 गावांतील शेतकरी आक्रमक, भाजपला दिला थेट इशारा

Husband Wife Case: पत्नीसोबत अनैसर्गिक संबंध बलात्कार म्हणता येणार नाही; हायकोर्टाचं मत

Relationship Tips: योग्य वयात लग्न न केल्याचे तोटे जाणून घ्या

Today's Marathi News Live : अखेर काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर

Summer AC Tips: उन्हाळ्यातील एसीचे भरमसाठ बिल येतयं का? 'या' पद्धतींने करा कमी

SCROLL FOR NEXT