Beed News
Beed News विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed: रस्त्याचं काम ठरतंय नागरिकांची डोकेदुखी; वाहनधारकांना करावी लागतेय कसरत

विनोद जिरे

बीड - शहरात अतिशय संथ गतीने सुरू असलेलं रस्त्याचं काम, नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. वाहनधारकांना आपली वाहनं चालवतांना, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शहरातील जालना रोड (Jalna) आणि बार्शी (Barshi) रोडच्या मुख्य रस्त्याचं काम, सध्या सुरु असून यामुळं धुळीचे लोळ आणि वाहतूक कोडीनें नागरिक त्रस्त झाले आहेत.

हे देखील पहा -

तर या रस्ता कामामुळे नागरिक शहरातील भाजी मंडई, सुभाष रोड , माळीवेस, शाहू नगर भागातून जात आहेत. परिणामी प्रत्येक पाच ते दहा मिनिटाला या भागामध्ये देखील वाहतुकीची कोंडी होत असल्याने, नागरिकांचा जीव अगदी मेटाकुटीला येत असल्याचे पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे धुळीचे लोळ मोठ्या प्रमाणात निघत असून यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला.

दरम्यान दिवसभरात वाहतुकीचे नियोजन लावण्यास वाहतूक पोलिसांची देखील दमछाक होत असून रस्त्याच्या कामाची गती वाढवून लवकरात लवकर काम पूर्ण करावे. अशी मागणी बीडकरांमधून होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT