Bharat Jodo Yatra News
Bharat Jodo Yatra News Saam TV
महाराष्ट्र

Bharat Jodo Yatra: कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत दंगल नियंत्रण पथक तैनात; मनसेच्या इशाऱ्यानंतर पोलिस सतर्क

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Bharat Jodo Yatra News: कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वात निघालेली ही यात्रा आता अकोला जिल्ह्यात आली आहे. या यात्रेच्या आणि राहुल गांधींच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा लवाजमा या यात्रेसोबत आहे. अशात भारत जोडो यात्रेत दंगल नियंत्रण पथकही सामील झाले आहे. राहुल गांधांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मनसे आणि भाजप कार्यकर्ते या यात्रेत अडथळा आणू शकतात, त्यामुळे पोलिस प्रशासनाने सावधगिरी म्हणून ही सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवली आहे. (Rahul Gandhi Latest News)

सावरकरांबाबत (Swatantryaveer Sawarkar) केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राहुल गांधींवर  (Rahul Gandhi) हिंदुत्ववादी पक्ष नाराज आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवण्याचे आदेश दिले होते. तसेच भाजपनेही राहुल गांधींविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलने केली होती. सोबतच राहुल गांधींवरोधात ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अशात भारत जोडो यात्रेला संरक्षण देण्यासाठी पोलिस प्रशासनाने दंगल नियंत्रण पथक तैनात केले आहे. या दंगल नियंत्रण पथकात ७० कमांडो असतील. यात्रेदरम्यान काही गोंधळ झाल्यास गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे पथक सक्षम असेल.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

अकोला जिल्ह्यात राहुल गांधींनी भाषण दिलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते की, सावरकर हे भाजप-आरएसएसचे प्रतीक आहेत. ते दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यांनी दयेचे अर्ज लिहायला सुरुवात केली. राहुल गांधींनी असा दावा केला होता की, सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वतःवर एक पुस्तक लिहिले आणि ते किती शूर होते हे सांगितले. ते म्हणाले, "ते इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांच्यासाठी काम करायचे आणि काँग्रेसच्या विरोधात काम करायचे." असं वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधींवर टीका होतेय.  (Latest Marathi News)

दरम्यान, राहुल गांधी यांची आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे सभा होणार असून अकोल्याहून बुलढाण्याकडे राहुल गांधींनी कूच केली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या या यात्रेचा हा शेवटचा टप्पा आहे. राहुल गांधींच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर्स होर्डिंग लावण्यात आलेले आहे. याहीपेक्षा वेगळे म्हणजे बुलढाणा-अकोला जिल्ह्याच्या सीमेवर वरखेड फाटा या ठिकाणी विठ्ठलाची भव्य मूर्ती उभारण्यात आली असून त्या ठिकाणी वारकऱ्यांचा रिंगण सोहळा पार पडणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Waris Pathan : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट ; वारीस पठाण निवडणुकीच्या रिंगणात, लढत तिरंगी होणार

Sambhajinagar News : शैक्षणिक वर्ष आटोपले तरीही शिष्यवृत्ती अर्जाचा तिढा कायम; १० हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित

Buldhana DJ Banned News : बुलढाणा जिल्ह्यात DJ वाजवण्यास बंदी, 22 डीजेवर पोलिसांकडून कारवाई

वर्ल्डकप संघात स्थान मिळताच स्टार खेळाडूची सुपरफ्लॉप कामगिरी!ठरला राजस्थानच्या पराभवाचं कारण

Vastu Tips: कामाच्या टेबलवर ठेवू नका या वस्तू, नकारात्मकता वाढेल

SCROLL FOR NEXT