Radhakrishna Vikhe On Uddhav Thackeray  Saam TV
महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe News : उध्दव ठाकरेंची बौद्धिक दिवाळखोरी निघाली; महसूल मंत्री विखे पाटलांची बोचरी टीका

Radhakrishna Vikhe Patil News : महसूल मंत्री विखे पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

भारत नागणे

Radhakrishna Vikhe On Uddhav Thackeray : उध्दव ठाकरे यांनीच पहिल्यांदा विश्वासघात करून भाजपच्या पाठीत खंजीर खूपसून मुख्यमंत्री पद मिळवले होते. सत्ता गेल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे ते खालच्या पातळीवर टीका करत आहे. त्यांची बौद्धिक दिवाळखोरी निघाली आहे अशी, टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. (Latest Marathi News)

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज सांगोला येथे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. (Breaking Marathi News)

काय म्हणाले विखे पाटील?

"उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्तेच्या लालसेपोटी मागच्या दाराने जनतेचा भावनेचा विश्वास घात केला. औरंजेबाच्या भूमिकेचे उदात्तीकरण करणाऱ्यांचे समर्थन केले. उध्दव ठाकरे यांनी जनतेची माफी मागी व अशी मुक्ताफळे उधळण बंद करावे", असे महसूल मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे.

"राज्यगीताचा अनादर माझ्याकडून तरी होणार नाही. व्यासपीठावर बसेपर्यंत ते सुरू झाले. याबाबत सूचना करून वाजवणे गरजेचे आहे. त्याबद्दल काही संकेत आहेत. तरीही अनवधानाने झाले, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमकपणे भूमिका मांडतात पण त्यांनी पातळी सोडू नये", अशी सूचना विखे पाटील यांनी केली. (Maharashtra Political News)

'उध्दव ठाकरेंबद्दल बोलण्याची विखेंची औकात नाही'

उध्दव ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची औकात आहे काय?, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारला आहे. "शिवसेना प्रमुखांचा चोरलेला धनुष्यबाण घेऊन त्याचं पूजन करायला अयोध्येला चालले आहेत. याआधी उध्दवसाहेब अयोध्येत जाऊन आलेत. त्यांनी मंदिर फिर सरकार अशी घोषणा केली होती, त्यामुळे आता अयोध्येत जाण्यात कोणतंही मोठं काम नाही", असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Like And Subscribe: अमेय वाघ आणि अमृता खानविलकरचा ‘लाईक आणि सबस्क्राइब’ OTT वर होणार रिलीज! कुठे अन् कधी पाहता येणार?

Maharashtra News Live Updates: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज नाशिकमध्ये धडाडणार

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात 'या' ठिकाणी ठेवा मोराचे पिस

EIL Recruitment: इंजिनियर झालात? या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, पगार २ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले

SCROLL FOR NEXT