पारनेरच्या महसूल कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेत आपली बाजू मांडली. 
महाराष्ट्र

तहसीलदार देवरेंविरूद्ध कर्मचाऱ्यांचे अण्णांकडे गाऱ्हाणे

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील महसूल आणि लोकप्रतिनिधी नीलेश लंके यांच्यामधील वाद आता वेगळ्या वळणार गेला आहे. तहसीलदार विरूद्ध महसूल कर्मचारी अशी या वादाने कलाटणी घेतली आहे. प्रारंभी नीलेश लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे यांनीही आपली बाजू अण्णांच्या दरबारी मांडली. आता कर्मचाऱ्यांनीही अण्णांकडे वारी केली.

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या दडपशाही व भ्रष्टाचाराविरोधात बेमुदत आंदोलन सुरू केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी तालुक्यातील महसूल, आरोग्य व ग्रामविकास विभागाच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे व्यथा मांडल्या. हजारे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत, या वादात पडणार नसल्याचे सांगून, तुम्ही वरिष्ठांकडे लढा, असे सांगितले. Revenue employees lodge complaint against Tehsildar Deore abn79

या वेळी हजारे यांच्या भेटीला आलेल्या शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले. आम्ही दिलेले निवेदन अण्णा वाचतील, आमच्या मागण्या योग्य वाटल्या, तर त्यावर ते निर्णय घेतील. आमचे आंदोलन आम्हाला न्याय मिळेपर्यंत सुरूच राहणार आहे, अशी माहिती महसूल संघटनेचे संतोष मांडगे यांनी दिली.

मांडगे म्हणाले, की शेतकरी, तसेच नागरिकांच्या कामांमध्ये, तहसील कार्यालयातील काम बंद आंदोलनामुळे अडचणी येणार आहेत. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, आम्हाला अन्याय सहन न झाल्यामुळे हे पाऊल उचलावे लागले. या वेळी महेंद्र रोकडे, मच्छिंद्र उंडे, पंकज जगदाळे यांच्यासह आरोग्य व ग्रामविकास विभागाच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी हजारे यांच्यापुढे आपल्या व्यथा मांडल्या.

मी या वादात पडणार नाही, असे मी याअगोदरच सांगितले आहे. मात्र, अन्यायाविरोधात आवाज उठविणे, हा दोष नाही. अन्यायाविरोधात लढणे योग्य आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या मागण्या वरिष्ठांकडे मांडा, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलकांपुढे व्यक्त केले. Revenue employees lodge complaint against Tehsildar Deore abn79

लोकांचे नुकसान होणार नाही

विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशासाठी तलाठ्यांकडून आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आमच्याकडून दिली जातील. त्यांना निश्चितच आमचे सहकार्य राहील. तसेच, आता सर्वत्रच डिजिटल सात-बारा, आठ-अ व फेरफार मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची कामे करताना जास्त अडचणी येणार नाही. मात्र, अडचणी आल्यास आम्ही सर्व त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

- संतोष मांडगे, अध्यक्ष, महसूल संघटना, पारनेर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT