Manasvi Choudhary
विवाहित महिला लग्नानंतर मंगळसूत्र घालतात. आजकाल मंगळसूत्र हे केवळ एक दागिना नाही तर फॅशन स्टेटमेंट बनला आहे.
पूर्वी फक्त एका पॅटर्नचे मंगळसूत्र असायचे मात्र आता बाजारात नवीन नवीन डिझाईन्सचे मंगळसूत्र असतात जे तुम्ही ट्रेडिशनल आणि वेस्टर्न दोन्ही लूकवर घालू शकता.
सध्या काळे मण्यांचे नाजूक मंगळसूत्र ट्रेंडमध्ये आहे. सोन्याच्या चैनमध्ये काळे मनी आणि छोटा हिरे पेडंट असा लूक दिसतो.
पारंपारिक लूकवर तुम्ही खास मोर, कमळ नक्षी असलेले पेडंट मंगळसूत्र घालू शकता हे पैठणी, नऊवारी साड्यांवर उठून दिसतात.
ज्यांना जुन्या पद्धतीचे वाटी मंगळसूत्र डिझाईन आवडत नाही त्यांच्यासाठी पेंडटमध्ये इव्हिल आय, डायमंड, त्रिकोण, फ्लोरल पेडंट डिझाईन तुम्ही निवडू शकता.
मंगळसूत्राच्या मध्यभागी सोन्याच्या अक्षरात तुम्ही पतीचे किंवा तुमचे नावांचे पेडंट बनवू शकता हा युनिक मंगळसूत्र पॅटर्न आहे.
ज्यांना गळ्यात मॉडर्न लूकवर मंगळसूत्र घालयचे नाही त्यांनी ब्रेसलेट मंगळसूत्र निवडावे. हे मनगटात घड्याळासारखे किंवा ब्रेसलेटसारखे घातले जाते. यात काळे मणी आणि सोन्याचे छोटे पेंडंट असते.