Amravati police suicide Saam TV News
महाराष्ट्र

Amravati : हृदयद्रावक! निवृत्त पोलिसानं आयुष्य संपवलं, आजारपणाला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय

Amravati police suicide : अमरावतीत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यातून तीन वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या ६१ वर्षीय पोलिस जमादार राजेश शंकरराव पाटील यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली.

Namdeo Kumbhar

अमर गटारे, अमरावती प्रतिनिधी

Retired Amravati police officer commits suicide due to illness : अमरावती शहर पोलिस दलातून तीन वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या ६१ वर्षीय पोलिस जमादाराने आजारपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीवरून त्यांनी आजारपणामुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. पोलिसांकडून याचा तपास केला जात आहे.

मृताचे नाव राजेश शंकरराव पाटील असे आहे. राजेश पाटील २०२२ मध्ये अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यातून पोलिस जमादार म्हणून निवृत्त झाले होते. सोमवारी दुपारी त्यांच्या घरी कोणीही नसताना त्यांनी दोरीने गळफास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश पाटील यांना गेल्या काही वर्षांपासून मधुमेह आणि किडनीचा गंभीर आजार होता. या आजारांमुळे त्यांचे जवळपास २० किलो वजन कमी झाले होते. सततच्या आजारपणामुळे त्यांना जगणे असह्य झाले होते, असे त्यांनी घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

चिठ्ठीत त्यांनी लिहिले आहे, “या आजारामुळे आता जगणे असह्य होत आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे.” यावरून त्यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत असल्याचे राजापेठ पोलिस ठाण्याचे ठाणेदार पुनीत कुलट यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana News : कॅन्सरग्रस्त महिलेला त्रास दिला, मुलीशी गैरवर्तन; शिवसैनिकांनी महाविद्यालयातील कर्मचाऱ्याला चोपला

Maharashtra Live News Update: - मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळली

Dombivli : रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात धुतली केळी, डोंबिवलीत किळसवाणा Video Viral

UPI New Rules 2025 : UPI वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; हे 3 नियम 1 ऑगस्टपासून लागू

Nanded News: गोदावरीत काहीतरी चाललं होतं… पोलिसांनी थेट नदीमध्ये उड्या मारल्या आणि मग काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT