नागपुरात निर्बंध शिथील, पण हॉटेल व्यावसायिक मात्र नाराज!... (पहा व्हिडिओ) संजय डाफ
महाराष्ट्र

नागपुरात निर्बंध शिथील, पण हॉटेल व्यावसायिक मात्र नाराज!... (पहा व्हिडिओ)

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे.

संजय डाफ साम टीव्ही नागपूर

नागपूर : कोरोनाची Corona दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा Delta variant धोका अद्याप अजून देखील कायम आहे. अशा वेळेस राज्य सरकारने State Government एक महत्वाचा निर्णय हाती घेतला आहे. राज्य सरकारने कोरोना पॉझिटिव्हिटी Positivity रेट कमी असलेल्या शहरामध्ये आणि जिल्हांत शिथीलता देण्यात येणार आहे. यानुसार नागपुर Nagpur मध्ये निर्बंध शिथील झाले आहेत.

हॉटेल उघडी ठेवायला दुपारी ४ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. पण सरकारच्या या निर्णयाने हॉटेल व्यावसायिकामध्ये नाराजी आहे. आता शिथीलता नको तर मोकळेपणा द्या, आम्ही रात्रीपर्यंत हॉटेल सुरु ठेवणार, असा इशारा हॉटेल व्यावसायिक यावेळी सरकारला दिला आहे. राज्य सरकारच्या नव्या आदेशाने हॉटेल व्यावसायिक मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत.

पहा व्हिडिओ -

सरकार व्यापाऱ्यांमध्ये फूट पाडत असल्याचे आरोप नागपुरमधील व्यापाऱ्यांनी केला आहे. तसेच आम्ही सरकारच्या निर्णयावर खूश नाही असे सांगत हॉटेल रात्रीपर्यंत सुरु ठेवणार असल्याचे हॉटेल चालकांनी यावेळी सरकारला इशारा दिला आहे. नागपूर मधील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने काल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. कोरोनाने ओढावलेली परिस्थिती फडणवीसांच्या कानावर देखील घातली आहे.

आता आम्हाला जगायचे असेल तर दुकाने चालू करण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे सरकारने जर आता नागपूरमधले निर्बंध शिथील केले नाहीत तर आम्ही सरकारचे न ऐकता दुकाने उघडे करू, प्रसंगी असहकार आंदोलन छेडू, असा आक्रमक नागपूर व्यापाऱ्यांनी फडणवीसांना भेटल्यावर व्यक्त केला आहे. सतत निर्बंधांनमुळे व्यापार संपत चालला आहे. त्यामधून अर्थकारणावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

छोटे दुकानदार आणि व्यासायिक यांचे जगणे आता कठीण होऊन बसले आहे. हॉटेल्सचा व्यवसाय खरे म्हणजे दुपारी ४ नंतर सुरू होतो. पण सरकारच्या या नियमाने ४ वाजता सारे बंद करावे लागत आहे. व्यवसाय अडचणीत आल्यामुळे नोकरदारांना वेतन देणे देखील या व्यवसायिकांना कठीण होऊन बसले आहे. यामुळे कोरोनाची स्थिती ज्या ठिकाणी बर्‍यापैकी आटोक्यात आली आहे. त्याठिकाणी अनलॉक करा, अशी मागणी फडणवीसांनी या पत्राद्वारे मुख्ममंत्र्यांकडे मागील आठवड्यात केली होती.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT