जयगड किल्ल्यावरील बुरुज ढासळल्याची चर्चा सुरु झाल्याने आता पुन्हा एकदा जयगड किल्ल्याचे (jaigad fort) संवर्धन आणि जतन झाले पाहिजे. त्यासाठी ठोस पावले उचलली जावीत अशी मागणी दुर्ग प्रेमी आणि रत्नागिरी जिल्हावासियांकडून केली जात आहे. (Maharashtra News)
रत्नागिरी जिल्ह्यातल्या (Ratnagiri) जयगड किल्ल्याचा बुरुज ढासळल्याचे व्हिडिओ (Video Viral) आणि फोटो काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर फिरत होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली. दरम्यान यावेळी संपूर्ण प्रकरण आणि बुरुज ढासळल्याच कारण जाणून घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या पंचांनी अहवाल दिला आहे.
यामध्ये जेएसडब्ल्यू (JSW) या कंपनीच्या जेट्टीचे काम सुरू आहे. त्यावेळी समुद्रात साधारणपणे 200 ते 250 मीटर अंतरावरती होत असलेल्या ड्रेझिंग आणि ड्रिलिंगमुळे बुरुजाला तडे गेल्याचा जबाब मंडल अधिकारी यांना लिहून दिला आहे.
मंडल अधिकारी यांच्याकडून हा जबाब अर्थात हि पंचयादी आज (गुरुवार) तहसीलदार यांना दिली जाईल. त्यानंतर तहसीलदार जिल्हाधिकारी यांच्याकडे सदरचा जबाब सादर करून पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल.
पाच ते सहा महिन्यांपूर्वी जेट्टीचे काम सुरू झाले. त्यानंतरच हा बुरुज ढासळण्यास सुरुवात झाल्याचं म्हणणं देखील या पंचांचं आहे. जयगड गावचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक आणि पुरातत्व विभागाकडून जयगड किल्ल्याची देखभाल करण्यासाठी नेमण्यात आलेली व्यक्ती असा चार जणांचा या पंचयादीत समावेश आहे.
शेकडो वर्षे जुने असं किल्ल्याचे बांधकाम आहे. शिवाय, बुरुजावर झाडे देखील उगवलेली आहेत. त्यामुळे बुरुज ढासळला असावा प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता. पण त्यानंतर आता समुद्रात सुरू असलेल्या जेट्टीच्या कामामुळे पंचांचं म्हणणं आहे. यानंतर आता अभ्यासक असतील किंवा तज्ञ यांच्याकडून अधिक सखोल अभ्यास केला जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान किल्ल्याचे संवर्धन आणि जतन झाले पाहिजे. त्यासाठी ठोस पावले उचलली जावीत अशी मागणी दुर्ग प्रेमी आणि जिल्हावासियांकडून केली जात आहे. जयगड हा किल्ला केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे देखभालीसाठी देण्यात आलेला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.