Laxman Hake Reservation Demands For Nabhik and Dhobi Saam tv
महाराष्ट्र

Laxman Hake: आरक्षणाचा वाद वाढणार; SC मधून 'या' समाजालाही आरक्षण द्या; लक्ष्मण हाकेंची नवी मागणी

Laxman Hake Reservation Demands For Nabhik and Dhobi: लक्ष्मण हाके यांनी आरक्षणासंदर्भात नवी मागणी केलीय. धनगर समाजाला आणि बंजारा समाजाने एसटीमधून आरक्षणाची मागणी केलीय. त्याचवेळी हाकेंनी नाभिक आणि धोबी समाजासाठी नवी मागणी केलीय.

Bharat Jadhav

  • मराठा, ओबीसी, बंजारा, धनगर समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमनेसामने.

  • मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे वाद वाढलाय.

  • ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी नवी मागणी केलीय.

मराठा, ओबीसी, बंजारा, धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत सरकारनं कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला. त्यानंतर राज्यात मराठा-ओबीसी गट आमनेसामने आलेत. आता एसटी प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी केली जातेय. त्याच दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी नवी मागणी केलीय. त्यामुळे राज्यातील वातावरण आणखीन तापलंय.

एसटी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी बंजारा समाजानं आंदोलन सुरू केलंय. पण बंजारा समाजाच्या मागणीला आदिवासी समाजाकडून विरोध केला जात आहे. त्यामुळे आदिवासी आणि बंजारा समाज आमने-सामने आलेत. तर दुसरीकडे धनगर समाजाचं देखील आंदोलन सुरू झालंय. धनगर समाजालाही एसटीमध्ये आरक्षण हवे आहे. आरक्षणावर सर्वत्र वाद सुरू असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी नवीन मागणी केलीय.

नाभिक, धोबी समाजाला एससीमधून आरक्षण द्या, अशी मागणी हाकेंनी केलीय. बलुत्या-आलुत्यामधील आमचा नाभिक समाज असेल, धोबी समाज असेल, बलुत्या -आलुत्या वाल्यांना एससी आरक्षण मिळावे, अशी मागणी त्यांनी केलीय. हाकेंच्या या मागणीमुळे पँथर सेना आक्रमक झाली असून संघटनेकडून त्यांना धमकी वजा इशारा देण्यात आलाय. लक्ष्मण हाके यांनी एससी आरक्षणाकडे वाकड्या नजरेनं पाहू नये, वाकड्या नजरेनं पाहिलं तर डोळे काढून हातात देऊ असा इशारा पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी दिलाय.

ओबीसी आंदोलनात फूट?

 बीडमध्ये २८ सप्टेंबर रोजी ओबीसी समाजाद्वारे मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्याच्या निमित्ताने बॅनर लावण्यात आलंय. या बॅनरमधून लक्ष्मण हाके यांचा फोटो गायब असल्याची माहिती समोर आलीय.  मेळाव्याच्या बॅनरमध्ये लक्ष्मण हाके यांचा फोटो नसल्याने त्यांना मेळाव्यातून वगळण्यात आल्याची चर्चा सुरु झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Gochar: 12 महिन्यांनी बुध करणार गुरुच्या राशीत प्रवेश; 'या' राशींच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा

Success Story: हालाखीची परिस्थिती, शाळेसाठी रोज ६ किमी पायपीट; मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

SCROLL FOR NEXT