Nana Patole-Ashish Dehsmukh Saam TV
महाराष्ट्र

Congress News : नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवा, आशिष देशमुखांची काँग्रेस अध्यक्षांकडे तक्रार

सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीला नाना पटोले हेच जबाबदार आहेत, असं आशिष देशमुख यांनी म्हटलं.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : महाराष्ट्र काँग्रेसमधील खदखद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.महाराष्ट्रातील काँग्रेसची स्थिती सध्या चिंताजनक आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पदावरून हटवा अशी मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. यासाठी आशिष देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र देखील लिहिलं आहे.

सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीमुळे पक्षावर नामुष्की आली आहे. सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीला नाना पटोले हेच जबाबदार आहेत. एक मोठा राजकिय पक्ष आज आपलं अस्तित्त्व टिकवण्यासाठी धडपडत आहे. ही बाब चिंताजनक असल्याचं आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस सकारात्मक कार्य करत नाही. गेल्यावेळी नागपूर विधानपरिषद जागेवर वेळेवर रविंद्र भोयर यांना बदलण्यात आलं. शिंदे -फडणवीस सरकार बहुमत चाचणीच्या वेळेस काँग्रेसचे १० आमदार अनुपस्थित होते, त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई झालेली नाही. म्हणूनच राज्यात काँग्रेसची स्थिती सुधारण्यासाठी तात्काळ प्रदेशाध्यक्ष बदलण्याची गरज आहे.

आशिष देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची थेट राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष या तक्रारीची काय दखल घेतात हे लवकरच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blue Number Plate: कोणत्या गाड्यांना निळ्या नंबर प्लेट दिल्या जातात आणि का? वाचा त्यामागील खास कारणे

Navi Mumbai : नवी मुंबईतील बस आगारात भीषण आग; नेमकं काय घडलं? | VIDEO

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Beed Crime: वेळेवर पैसे देता येत नसेल तर तुझी बायको...; सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या; बीड हादरले

Heavy Rain : नाशिक, भंडाऱ्यात पावसाची संततधार; बागलाण मधील हरणबारी धरण ओव्हरफ्लो

SCROLL FOR NEXT