ही दृष्य नीट निरखून पाहा, पोलिसांनी ज्यांची वरात काढलीये. त्या ६ कारट्यांना नीट पाहा. हात जोडून, खांदे उतरवून, खाली माना घालून चालणारे हे कोल्हापूरातले टवाळखोर आहेत. होय, टवाळखोरच. पोलिसांनी त्यांची धिंड काढून त्यांना आता जन्माची अद्दल घडवलीये.
आता तुम्ही म्हणाल यांचा दोष काय ? पोलिसांनी यांचा माज असा उतरवला. तर त्यासाठी पाहा हा व्हिडिओ
पाहिलंत, हातात सिगारेट, 2025 मध्ये मर्डर फिक्स असं लिहीणारे आणि सिनेमाचा डायलॉग लावून रिल्स बनवत दहशत माजवणारे हे माजुर्डे आपल्या छत्रपती शाहुच्या जन्मभूमी कोल्हापुरातील...हे तरुण खुल्लेआम आपल्या पोलिसांना ओपन चॅलेंज देत दहशत माजवत सुटले होते. आणि मग पोलिसांनी यांचा माज हा असा उतरवला...
पुणे, नाशिक, मुंब्र्यांत या अशाच माजुरड्यांमध्ये दहशत पसरवणारे रिल्स बनवण्याची स्पर्धाचं लागलीय. आणि आता हेच शाहुनगरीपर्यंत येऊन पोहचलंय. परंतू पोलिसांनी या समाजकंटकांना कोल्हापुरी झटका देऊन त्यांचा माज उतरवून हे कायद्याचं राज्य असल्याचं दाखवून दिलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.