Health Department Recruitment  Saam TV
महाराष्ट्र

Government Job : आरोग्य विभागात मोठी भरती, १० हजार तरुणांना सरकारी नोकरीची संधी, पाहा संपूर्ण वेळापत्रक

: आरोग्य विभागात नोकरीसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.

साम टिव्ही ब्युरो

Health Department Recruitment : आरोग्य विभागात नोकरीसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची आहे. राज्यात आरोग्य विभागात तब्बल १० हजार जागांसाठी (Government Job) भरती होणार आहे, अशी माहिती मंत्री गिरीष महाजन यांनी याबाबतची घोषणा केली. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं गिरीष महाजन यांनी सांगितलं आहे.

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून आरोग्य भरतीचा प्रश्न प्रलंबित होता. त्यामुळे परीक्षेची तयारी करत असलेल्या युवकांमध्ये निराशा होती. परंतू कोरोना काळामुळे, आरक्षणाच्या अडचणीमुळे तसेच महापोर्टलच्या रद्द होण्याने दरम्यानच्या काळातील भरती होऊ शकली नाही.

दरम्यान, राज्यात नव्याने स्थापन झालेलं सरकार हे तरुणांच्या भविष्यासाठी आणि कल्याणासाठी कटिबद्ध आहे. त्यानुसार पुढच्या २ महिन्यात आरोग्य विभागाच्या संबंधित १० हजार १२७ जागांची भरती होईल, अशी माहिती गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली.

आरोग्य भरतीत या उमेदवारांना मिळणार प्राधान्य

कोरोना संकटात वैद्यकीय सेवेत कर्तव्य बजावलेल्या कंत्राटी कामगारांना आरोग्य विभागातील भरतीला प्राधान्य मिळणार आहे. त्यासाठी या कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी, असे निर्देश शिंदे फडणवीस सरकारने दिले आहेत.

आरोग्य भरती कधी होणार?

आरोग्य भरतीची जाहिरात १ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान निघेल. तसेच २५ ते २६ मार्चदरम्यान भरती परीक्षा होईल, २७ एप्रिलपर्यंत उमेदवारांची निवड केली जाईल, अशी माहिती मंत्री महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :तीन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेला पलावा पूल पुलावरील रस्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत

Amla Chutney : जेवणासोबत रोज लोणचं कशाला? घरीच करा चटपटीत आवळ्याची चटणी

OYO Hotel: कपल्सची होणार गोची? तासांवर रूम मिळणं होणार कठिण? VIDEO

Nagpur Tourism : नागपूरमधील विरंगुळ्याचे ठिकाण, 'येथे' घ्या क्षणभर विश्रांती

Shocking: 'ती'ओरडत राहिली पण..१० वर्षीय चिमुकलीचे नराधम पित्याने लचके तोडले, आईला कळताच..

SCROLL FOR NEXT