Bacchu Kadu : बच्चू कडूंना कोर्टाचा दणका; 'त्या' प्रकरणात ५ हजारांचा दंड

अपक्ष आमदार आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना उस्मानाबाद न्यायालयाने मोठा दणका दिला आहे.
Bacchu kadu
Bacchu kadu Saam Tv
Published On

अमरावती : अपक्ष आमदार आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना उस्मानाबाद न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. बच्चू कडू यांच्यासह अन्य तीन जणांना न्यायालयाने ५ हजारांचा दंड ठोठावला आहे. इतकंच नाही तर न्यायालयाने बच्चू कडूंना फटकारलं देखील आहे. सुनावणीला हजर न राहिल्यास जामीन रद्द केला जाईल अशी तंबी बच्चू कडूंना दिली आहे. (Bacchu Kadu News Today)

Bacchu kadu
बदलापूरजवळच्या कोंडेश्वरमध्ये चार अल्पवयीन मुलं बुडाली; मुंबईहून पिकनिकसाठी आले होते

काय आहे प्रकरण?

अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जानेवारी २०१९ मध्ये उस्मानाबाद (Osmanabad) जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान मोठा वाद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी बच्चू कडू यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर बच्चू कडूंनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयाने बच्चू कडूंना जामीन देत मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर सुनावणीसाठी वेळेवर हजर राहावं लागेल, असा आदेश कोर्टाने बच्चू कडूंना दिला होता. दरम्यान, आमदार बच्चू कडू कोर्टात हजर न झाल्याने उस्मानाबाद कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले होते.

आज बच्चू कडू स्वत:हू कोर्टात हजर झाले, दरम्यान, उस्मानाबाद कोर्टाने बच्चू कडू यांना खडे बोल सुनावले. यापुढे सुनावणीला हजर न राहिल्यास जामीन रद्द करण्याची तंबी देखील जिल्हा न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी दिली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com