Sharad Pawar Saam TV
महाराष्ट्र

NCP: मोठी बातमी! शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचा नंबर; निवडणूक आयोग पवारांना देणार मोठा धक्का?

NCP National Party Status: या संदर्भात मंगळवारी आयोगासमोर पक्षाच्या वतीने बाजू मांडण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Election Commission: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांना निवडणूक आयोगाने मोठा दणका दिला. उद्धव ठाकरे यांच्या हातातील शिवसेना आणि निवडणूक चिन्ह काढून घेण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यात आलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना ताजी असतानाच आता निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसला दणका देण्याच्या तयारीत आहे.

याच कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय दर्जा’चा निवडणूक आयोगाकडून फेरविचार करण्यात येत असून, मंगळवारी आयोगासमोर पक्षाच्या वतीने बाजू मांडण्यात आल्याचे समजते.

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या ‘राष्ट्रीय दर्जा’चा निवडणूक आयोगाकडून (Election Commission OF India) फेरविचार करण्यात येत असून, मंगळवारी आयोगासमोर पक्षाच्या वतीने बाजू मांडण्यात आली आहे. राष्ट्रवादीसह तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पक्ष या पक्षांनाही आयोगाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर निवडणूक आयोगाकडून पक्षांच्या दर्जाबाबत समीक्षा केली जाते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीसह बसप आणि भाकपच्या राष्ट्रीय दर्जाबाबत फेरविचार सुरू झाला होता. मात्र त्यावेळी निवडणूक आयोगाने आणखी पाच वर्षे थांबण्याचा निर्णय घेतला.

मात्र मंगळवारी निवडणूक आयोगाने या सर्व पक्षांना आपली बाजू मांडण्याची सूचना केली होती. त्यानुसार राष्ट्रवादीचे नेते, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाचे वकील सुनावणीला हजर होते.

राष्ट्रीय पक्ष असल्याचे फायदे..

  • ज्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो त्यांच्या पक्षाच्या निवडणूक चिन्हाला संपूर्ण देशात मान्यता मिळते.

  • राजधानी दिल्लीत पक्ष कार्यालयासाठी जागा मिळते.

  • निवडणुकीच्या काळात पब्लिक ब्रॉडकास्टर्सद्वारे ऑन एअर येण्याची संधी मिळते. त्यामुळे पक्षाला आपलं म्हणणं देशवासियांपर्यंत पोहोचवणं शक्य होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

Horoscope Sunday Update : विठ्ठलाच्या कृपेमुळे भाग्यकारक घटना घडतील, वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: 14 जुलै रोजी विदर्भातील 6 हजारपेक्षा अधिक दारूचे बार राहणार बंद

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

SCROLL FOR NEXT